Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सामाजिक

भगवे झेंडे घेतलेल्या जमावाकडून दगडफेक-कोरेगाव भीमा हिंसाचार

सामाजिक
मुंबई/दि/ कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष काढणार्या पुण्याच्या सत्यशोधन समितीचे सदस्य भीमराव बनसोड यांनी गुरुवारी चौकशी आयोगापुढे साक्ष नोंदविली. ‘१ जानेवारीला भगवे झेंडे घेऊन हजारोंचा जमाव कोरेगाव भीमा येथे दाखल झाला. हे लोक स्थानिक नव्हते. या जमावाने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या जमावावर दगडफेक केली,’ असा निष्कर्ष त्यांनी या अहवालात काढला आहे.                 सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, वढूच्या रहिवाशांना १ जानेवारीला काहीतरी अघटित घडणार याची चाहूल लागली होती. कारण गोविंद गोपाळ समाधीच्या शेडची तोडफोड करण्यात आली. तेथील फलकही काढला होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ काहीतरी अघटित घडणार, अशी अफवाही पसरली होती.         &nb...

आगामी काळात उजव्या विचारसरणीचा अधिक धोका -मा. पोलीस महासंचालक

सामाजिक
पुणे/दि/ प्रतिनिधी/                 डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्या करून त्यांचे विचार संपणार नाहीत. अशाप्रकारची विचारधारा बाळगणेच चुकीचे आहे. कारण प्रत्येक प्रश्न बंदुकीने सुटत नाहीत. या विचारवंतांची हत्या करणारे सापडले तरी उजव्या विचारसरणीचा धोका काही संपणार नाही तर तो आगामी काळात आणखी वाढेल. त्यामुळे सर्वसामान्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत निवृत्त पोलीस महासंचालक एस.एस.विर्क यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी काळात सायबर क्राईमचे मोठे आव्हान                 आगामी काळात देशासमोर सायबर क्राईमचे मोठे आव्हान असणार ...
मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादी बनवू नका

मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादी बनवू नका

सामाजिक
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 काश्मीरमध्ये दगडफेक करणार्या तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जात असतील, तर महाराष्ट्र बंदमध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांवरील का नाही, असा सवाल उपस्थित करीत सकल मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी आझाद मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.                 उमेदीच्या काळात गुन्हे दाखल करून मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादाकडे वळण्यास भाग पाडू नका, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.आंदोलनात विविध जिल्ह्यांतील महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या आहेत.                 रूपाली पाटील म्हणाल्या, न्यायप्रविष्ट मागण्...
महिला शंकराचार्य बनू शकत नाही – स्वामी स्वरूपानंद

महिला शंकराचार्य बनू शकत नाही – स्वामी स्वरूपानंद

सामाजिक
मथुरा/दि/ महिला राजकारणासह कोणत्याही इतर क्षेत्रात जाऊ शकतात, मात्र त्या शंकराचार्य बनू शकत नाहीत, असे वक्तव्य द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे.                 इतकेच नाही तर, नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ पीठाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अखिल भारतीय विद्वत परिषदेवरही आक्षेप नोंदवले आहेत. अखिल भारतीय विद्वत परिषद या नावाने उभी करण्यात आलेली संस्था बनावट शंकराचार्य तयार करण्याचे काम करत आहे. या संस्थेने काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये पशुपतिनाथाच्या नावाने एक नवे पीठच निर्माण केले.                 मात्र अशाप्रकारचे कोणतेही पीठ असू शकत नाही, असे स्वामी स्वरूपानंद...

एससी-एसटी कायद्यातील बदलाला मंजुरी, जुन्या तरतुदी कायम राहणार

सामाजिक
नवी दिल्ली/दि/                 केंद्रीय मंत्रिमंडळाने एससी-एसटी कायद्यातील बदलाला मंजुरी दिली आहे. परंतु कायद्यातील जुन्या तरतुदी कायम राहणार आहेत. तसेच न्यायालयाने तात्काळ अटकेला दिलेल्या स्थगितीचा निर्णय केंद्र सरकारने बदलला आहे. ऍट्रॉसिटी कायद्यात तात्काळ अटकेला स्थागिती देणार्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने कायदा ‘जैसे थे’ लागू करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली. जुना ऍट्रॉसिटी कायदा जसा होता तसाच ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच, केंद्र सरकार संसदेत लवकरच यासंदर्भात कायदा बनवणार आहे असे सांगण्यात येत आहे.                 न्यायालयाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यात ...
१२ वर्षांआतील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्युदंड

१२ वर्षांआतील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्युदंड

सामाजिक
नवी दिल्ली/दि/  देशातील १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणात मृत्युदंडापर्यंतची शिक्षा असलेल्या आणि १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद असणार्‍या विधेयकाला सोमवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली.                 फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०१८ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान उत्तर देताना गृहराज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, मागील काही दिवसात देशात बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्याने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर आणि १६ वर्षांच्या आतील मुलींवरील अत्याचार प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.              &nb...