Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडूनच पुणे शहराला धोका, सिमाभिंती कोसळल्या, आता इमारती कोसळण्याची वाट पहायची काय…

pmc pune1

नैसर्गिक आपत्ती, भूकंपाने जेवढे नुकसान होणार नाही तेवढी आपत्ती, पुणे महापालिका आयुक्तांच्या ढिसाळ कारभारामुळे होण्याची शक्यता…

आधी दुष्कृत्य नंतर आपत्ती व्यवस्थापन

श्रीधर  येवलेकर पुणेकरांवर सुड का उगवत आहेत… पुण्यातील पेठा, उपनगरातही मनमानी कारभार, जे अधिकार मनपा आयुक्तांना नाहीत, त्याही अधिकारांचा येवलेकरांकडून वापर

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

       कोंढवा, धायरी येथील उंच-सखल डोंेगरी भाग व बाणेर,  धानोरी, वडगाव शेरी सारख्या ठिकाणच्या सिमाभिंती, ह्या, तांत्रिक निकष व शास्त्रीय दृष्टीकोनातून बांधल्या नसल्याने ते कोसळल्याचा निष्कर्ष  शासनाच्या अभियांत्रिकी विभागाने काढला आहे. अनेकांचे प्राण गेले तरी पुणे महापालिकेतील आयुक्तस्तरावरील यंत्रणा अद्यापही ठोस कार्यवाहीपर्यंत येत नाहीये. बांधकामा संदर्भात अनेकविध तक्रारी आयुक्त कार्यालयात पडून आहेत, परंतु ज्या लोकसेवकाने गुन्हा केलाय, पुन्हा त्याच्याकडेच पुनः चौकशीसाठी पाठविले जात असल्याने, पुणे महापालिका आयुक्त हे जाणिवपूर्वक पुणे शहराचे नुकसान करीत आहेत. सौरभ राव हे पुण्याचे जिल्हाधिकारी व दंडाधिकारी होते. आता पुणे मनपात आयुक्त आहेत, उद्या पुनः विभागीय आयुक्त होतीलही. त्यांना निव्वळ खुर्ची टिकवायची आहे. पुणे शहराची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याचा कोणताही हेतू नाहीये. त्यामुळे यावर्षी सिमाभिंती कोसळून अनेकांचे प्राण गेले, खरं तर पुणे महापालिकेने नियोजनपूर्वक केलेले हत्याकांडच आहे, उद्या इमारती देखील पत्याच्या बंगल्या सारख्या कोसळीतील तेंव्हा देखील, इतरांवर खापर फोडून नामानिराळे राहण्याची प्रवृत्ती पुणे शहराला हडप्पा व मोहोंजोदडो केल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही यात शंकाच राहीली नाही.

       पुणे शहरात कात्रज पासून खराडीपर्यंत आणि वारज्यापासून उंड्री पर्यंत सर्वत्र अनाधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. जमिनीत २५ फुट, ५० फुटापर्यंत जमिनीखाली दोन मजली, तीन व चार मजल्यापर्यंत पार्कींग आणि ऑफिसेस उघडली जात आहेत. काही ठिकाणी तर दोन पाच फुटांवर फुटींग पाया घेवून जी+६ मजल्यापर्यंत बांधकामे सुरू आहेत. ज्यांनी बांधकामाचा परवाना घेतला आहे, त्यांनी देखील मंजुर नकाशाव्यतिरिक्त बांधकामे करण्याचे सत्र सातत्यने सुरू आहे. पुणे शहरातील शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, कससा पेठ, येरवडा, कर्वेनगर, कोथरूड, बाणेर येथील मंजुर केलेल्या लेआऊट व्यतिरिक्त अनेकविध बांधकामे सुरू आहेत. काही ठिकाणी तर पुणे महापालिका आयुक्तांना देखील ज्या सवलती देता येत नाहीत, त्या सवलती देखील पुणे महापालिकेतील अभियंत्यांनी दिलेल्या आहेत. त्यांच्या संदर्भात पुणे महापालिका आयुक्तांकडे विविध संस्था व संघटनांनी निवेदने सादर केली आहेत. परंतु पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचा कमालिचा ढ्ढिम्म कारभार पुणेकरांना एक दिवशी मोहोंजोदडोची आठवण करून देतो की काय अशी आजची पुणे शहराची अवस्था झाली आहे.

श्रीधरपंत येवलेकर पुणेकरांवर सुड का उगवित आहेत –

पुण्यातील येरवडा परिसर. अतिशय दाटीवाटीने इमारती आणि चाळी. लोकसंख्येची प्रचंड घनता. सर्वत्र गजबजलेला विभाग. ह्या येरवडा गावठाणात जी + २ इमारत बांधकामाला परवानगी पुणे मनपाने दिली. ४.५५ मिटर पर्यंत इमारची उंची मान्य करण्यात आली. येरवडा गावठाणातील या इमारतीकडे जाण्यासाठी निव्वळ एक मिटरची बोळ असल्याने तेथे एवढ्याच उंचीपर्यंत मान्यता डीसी रूल प्रमाणे देता येऊ शकते. तथापी स्थानिक नगरसेवक आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बिल्डरांसोबत साथ संगनमत करून, जी+ ६ पर्यंत बांधकामाला परवानगी देण्यात आली. तथापी बाधंकाम विकास व नियंत्रण नियमावली नियम ६.५.२ नुसार महापालिका आयुक्तांना  देखील एफ.एस.आय, पार्कींग क्षेत्र, रस्त्यापासून सोडावयाचा सेट बॅक यामध्ये सवलत देण्याचा अधिकारच नाही. असा नियम आहे. परंतु डी. सी. रुल नुसार जे अधिकार महापालिका आयुक्तांना देखील नाहीत, त्या बेकायदा पद्धतीचा अवलंब करून, बांधकाम विभागाचे अभियंता श्रीधर येवलेकर यांनी ४.५५ मिटर वरून १७.२५ मिटर पर्यंत परवानगी दिली.

       येरवडा येथील इमारतीला बेकायदा परवानगी देत असतांना, एक मिटरच्या बोळातून  २० सदनिकांसाठी  एकुण १२ मोटार कार पार्कींग व ४६ टू व्हिलरचे पार्कींग देण्यात आले आहे. ज्या जागेतून टू व्हीलर जाऊ शकत नाही, तिथं १२ कार व ४६ टू व्हीलर कसे जाऊ शकतात हा एक गहन प्रश्‍नच आहे. ज्या इमारतीचा पाय मुळातच दोन मजल्यांसाठी आहे, तिथे त्याच फुटींग वा पायावर पाच मजल्यांची परवानगी कोणत्या निकषांच्या आधारे देण्यात आली. ज्या इमारतींचा पायाच कमकुवत असतांना, त्याच्यावर पाच मजल्यापर्यंत परवानगी देणे म्हणजे शहराचे उध्वस्तीकरण करण्यासारखेच आहे.

       पुणे शहरातील पेठा, आणि उपनगरात श्रीधर येवलेकर यांनी पुणेकरांना उध्वस्त करणारे निर्णय घेतले आहेत. जे अधिकार पुणे महापालिका आयुक्तांना नाहीत, त्या बेकायदा अधिकारांचा वापर श्रीधर येवलेकर यांनी केला आहे. दरम्यान बांधकामाला परवानी देत असतांना, ज्या नियम व अटी कागदावर असतात, त्यात नमूद केलेले असते की, बांधकाम परवानगी मागण्यापूर्वी बिल्डरने पोहोच रस्ता विकसित करावा असे नमूद असते. तथापी जेथे पोेहोच रस्ताच केलेला नसतांना, त्या इमारतीची प्लींथ चेक कशाच्या आधारे केली असा प्रश्‍नांचा, प्रश्‍नप्रपंच उभा राहिला आहे.

श्रीधरपंत, ….. ४.५५ मिटर वरून १७.२५ मिटरवरील उड्डाणासाठी किती रुपयांचा सौदा झाला – कोणत्या डीसी रुल नुसार प्रस्ताव मान्य केला हे एकदाचे सांगुन टाकाच –

       सांगुन  पैसे खाणे किंवा पैसे खाऊन सांगणे ही प्रथा पुणे महापालिकेत प्रचंड प्रचलित आहे. त्यापैकी पैसे खाल्ले आहेत ह्या प्रकारात सध्या श्रीधर येवलेकर आहेत. ४.५५ मिटर वरून १७.५५ मिटरपर्यंत बांधकाम परवाना कोणत्या नियम व अटींवर मान्य करण्यात आला याचे उत्तर सध्या येवलेकरांकडून मागविले जात आहे. पुणे महापालिका आयुक्तांचा आशिर्वाद असल्याशिवाय श्रीधर येवलेकर इतके धाडस करू शकत नाहीत. त्यामुळे हा सौदा नक्की किती रुपयांत ठरला हे आता उघड होणे आवश्यक आहे.

        पुणे महापालिकेत असं सांगितलं जात की, पुणे महापालिकेच्या हद्दीतील बर्‍याच लहान मोठ्या बांधकाम प्रकल्पात श्रीधर येवलेकर यांची पार्टनरशिप आहे. फायनान्सपासून ते इतर परवानगी पर्यंत श्रीधर येवलेकरांचा मोठा सहभाग असल्याचे सांगण्यात येते. शुक्रवार पेठ, कसबा पेठ, बुधवार पेठेतील प्रकल्पात श्रीधर येवलेकरांनी फायनान्स केला असल्याची पुणे महापालिकेत  चर्चा आहे. तसेच कर्वेनगर येथील प्रकल्पात प्लॉट नं. २ मधील ४ हजार २०० चौ. मी. च्या प्रकल्पातही मोठी गुंतवणूक केली असल्याची सांगण्यात येते. त्यामुळे ते एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक या बिरूदावलीपर्यंत पोहोचले असल्याचे सांगण्यात येत आहे.

       पुणे महापालिकेतील वर्ग एक ची नोकरी आणि त्यातही बांधकाम व्यावसायिक. अरे देवाऽऽऽ ही किमया सर्वांनाच जमते अस्सं नाहीये. हे कौशल्य श्रीधर येवलेकरांनी संपादन केलय ह्यात महापालिका आयुक्त सौरभ राव यांचा मोलाचा वाटाच म्हणावा लागेल. त्यामुळेच पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात श्रीधर येवलेकरांबाबत सुमारे ८ ते १० प्रकरणांबाबत तक्रार अर्ज सादर असतांना देखील त्या अर्ज व निवेदनांवर का कारवाई होत नाही याच अलिखित उत्तर पुणेकरांना मिळाले आहे.

अणाजी पंत आजही जीवंत आहेत तर…..

        सध्या एका खाजगी वाहीनीवर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा काटा काढुन, अकबराला अर्धे राज्य देवून, त्या बदल्यात राजाराम महाराजांना राजा म्हणून गादीवर बसवायचे आणि गादी आडून सर्व कारभार स्वतःच्या हातात घ्यायचा, म्हणजे स्वतःला राजा म्हणून घोषित करण्यासारखे होते. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी हा डाव ओळखुण बंडखोर मंत्र्यांना हत्तीच्या पायात व तोफांच्या तोंडी दिले. हे पात्र इथच समाप्त झालं. परंतु त्या पात्रातील प्रवृत्ती आजही जिवंत आहेत. हे पाहून पुणेकरांना धस्स् झालं नाही तर नवलच.

       पुणे शहरातील पेठा आणि उपनगरात वाट्टेल तसे निर्णय घेवून पुणे शहराला जमिनीत गाडण्याचे भरीय कार्य सध्या पुणे महापालिकेत सुरू आहेत. श्रीधरपंतासारख्या अधिकार्‍यांनी स्वतःला या कार्यात झोकून दिले आहे. त्यामुळे आता शिवरायांच्या मावळ्यांनी गनिमी काव्याने का होईना पुण्यनगरीचे संरक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे.(क्रमश) पुढील अंकी – पुणे पेठ शुक्रवार….