पुणे महापालिका बाधंकाम विभागाला ७७० कोटींचा फटका
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेला मागील वर्षी बांधकाम विभागाकडून सुमारे ८०० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले होते, परंतु चालु वर्षाच्या आठमाही सत्रात ३० कोटी रुपयांचा आकडाही गाठता आला नसल्याची कबुली, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे उत्पन्न घटले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असला तरी पुणे महापालिकेतील बांधकाम, टॅक्स आणि विधी विभागातील कपटी कारस्थानांमुळेच उत्पन्न घटले असल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊन होण्याच्या आधी मार्च पर्यंत ज्यांची बांधकामे सुरू होती, ती बांधकामे न थांबविता सुरूच ठेवली होती. लॉकडाऊनच्या काळातही ज्यांची बांधकामे सुरू होती, त्यातील ५० टक्के बांधकाम विकसक व मालकांनी, पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची मान्यता घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उत्पन्न घटले ही एक सबब...