बोक्याची नजर शिक्यावर अन् ८५ टक्के पोलीस कर्मचार्यांची अवस्था सासुरवाडीच्या पाव्हण्यासारखी झालीय
Swargate-Pune-Police
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
ओबीसी, आदिवासी, एनटी यांच शिक्षण व सरकारी नोकरीतील घटनात्मक आरक्षणाची पदे भरायची नाहीत, अनु. जाती प्रवर्गातील ५९ जातीमध्ये जाणिवपूर्वक एक जात दुसर्या जातीचा व्देष करेल अशा कपटी हेतूने शासनातील पदे भरण्याचा कार्यक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान घटनात्मक तरतुदी असलेल्या शिक्षणातील संधी व सरकारी नोकरीतील आरक्षणाची पदे व पदोन्नतीतील आरक्षण अनेकविध विघ्न निर्माण करून, खुल्या व मागासप्रवर्गातील पदोन्नती नाकरण्याचे षडयंत्र शासन स्तरावर अनेक वर्षांपासून गुप्तपणे सुरू आहे. बहुतांश आरक्षणाची पदे आणि पदोन्नतीतील आरक्षणाची प्रकरणे न्यायालयीन कक्षेत अडकुन पडली आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षातील राज्यकर्त्यांनी हे जाणून-बुजून व कु-हेतूक ठरवुन षडयंत्र केले आहे यात आता तिळमात...









