येरवडा आणि येरवड्याचे रेशनिंग कार्यालय म्हणजे वरून किर्तन आणि आतुन तमाशा
येरवडा रेशनिंग शिधापत्रिका कार्यालय
पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा आणि येरवड्याचं रेशनिंग अर्थात शिधापत्रिका कार्यालय म्हणजे तु रडल्यासारखं कर आणि मी मारल्यासारखं करतो अशी त्याची अवस्थ आहे. एजंटा खेरीज या कार्यालयात भल्या भल्यांचे कामच होत नाही. जिल्हाधिकारी पुणे साध्या गणवेशात गेले तरी त्यांचे देखील एजंटाशिवाय कामच होणार नाही, कागदात पकडायचे म्हटले तरी अधिकारी सहीसलामत बाहेर पडतात. त्यामुळे रेशनिंग कार्डाचे एवढे घोटाळे होवून देखील एकही अधिकारी किंवा कर्मचारी एकदाही निलंबित झालेला नाही. ह्याला म्हणायचे महसुली कारभार…
महा ई सेवा केंद्र, एजंट आणि रेशनिंग अधिकारी यांच ट्युनिंग इतक जुळलं आहे की, त्यांची एकमेकांची साखळी आहे. आणि एखादयावेळस हे बिंग फुटलच तर एकमेकांवर तुफानी चिखलफेक करून स्वतःला वाचविणे एवढेच काम एजंट आणि रेशनिंग अधिकार्यांचं असतं.येरवडा रेशनिंग कार्यालयाचे प्रमुख प्रशांत खताळ ...









