Sunday, May 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

स्वारगेट चौकातील हत्या आणि लुटीचा, गुन्हे शाखा युनिट ३ कडुन पर्दाफाश, कोरोना इमरजन्सी जामीनावर सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस न आलेले खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने नियुक्त केलेले गुन्हे शाखा युनिट निहाय करीत आहे. पोलीस स्टेशन पेक्षा गुन्हे शाखा अधिक वेगाने गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना अधिक तत्परतेने अटक करीत असल्याचे स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या हत्या आणि लुटीच्या प्रकरणांवरून दिसून आले आहे. गुन्हा युनिट ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली हे युनिट कार्यरत आहे.


गुन्ह्याची हकीकत अशी की, स्वारगेट चौकालाच जेधे चौक असे म्हटले जाते. या जेधे चौकात अर्थात स्वारगेट चौकातच स्वारगेट पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या मोजुन १५ ते २० पावलांवर ३ सप्टेंबर रोजी रात्रौ साडे अकारा ते बारा वाजण्याच्या सुमारास नागेश दगडू गुंड वय ३७ वर्षे हा युवक तुळजापूर येथील केरूळ जिल्हा उस्मानाबाद येथून स्वारगेट चौकात आला. येथे त्याचा मित्र कमलाकर शरनु घोडके हा नागेश गुंड याला कोथरूड येथे घेवून जाणार होता. त्याची वाट पाहत नागेश थांबलेला असतांना, त्याच्या जवळ एक अज्ञात इसम आला, व त्याने नागेश गुंड याच्याकडील पैसे व इतर एैवजांची मागणी केली. नागेश गुंड याने पैसे व एैवज देण्यास नकार दिल्याने चोरट्याने पैसे व इतर एैवज न मिळाल्यामुळे संशयित चोरट्याने नागेश गुंड याच्यावर कोयत्याने वार करून त्याला जबरी जखमी करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेवून फरार झाला. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या १०/ पंधरा पावलावंर ही घटना घडल्यानंतर, स्थानिक पोलीस व नागरीकांनी त्याला ससून हॉस्पीटल येथे नेत असतांना, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत अज्ञात चोरट्याविरूद्ध स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये ३०२, ३९७ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलीसांकडून सुरू असतांनाच, गुन्हे युनिट ३ कडील पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांना त्यांच्या खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की, स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा पुणे शहरातील सराईत गुन्हेगार ऋशिकेश कामठे याने केला असून त्याने इतरही जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. ही बाब गुन्हे शाखा युनिट ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मोकाशी यांना कळविल्यानंतर, राजेंद्र मोकाशी व व त्यांच्याकडील पथक पोीस उपनिरीक्षक किरण अडागळे, पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर, अतुल साठे, मेहबूब मोकाशी यांना नेमून वरील संशयित इसम कामठे वय ३४ वर्ष रा.  लोकमान्य कॉलनी, एन.जी पंपाजवळ कोथरूड पुणे याला सोमवारी रात्री साडेबारा वाजता जुना कचरा डेपो कोथरूड येथून ताब्यात घेण्यात आले. 

राजेंद्र मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील युनिटने पोलीस खाक्या दाखविताच आरोपीने शहरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. दरम्यान त्याने गुन्ह्यात वापरलेले वाहन ज्युपिटर मोपेड ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच कामठे हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हगार असून, तो लॉकडाऊनच्या काळात चार महिन्यांपूर्वी कोथरूड पोली सस्टेशन येथील ३०७, ३२३ व ३२४ या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून कोरोना इमरजन्सी जामिनावर सुटला आहे. तो सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे ३९४ या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आहे. तसेच त्याने येरवडा पोलीस स्टेशन येथे १५ दिवसांपूर्वी जबरी चोरी गुन्हा केल्याचीही कबुली दिली आहे. त्याने पुणे शहरात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, घरफोडी, जबरी चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. 
या कामगिरीबाबत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने गुन्हे शाखा युनिट ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मोकाशी व त्यांच्या संपूर्ण युनिटच अभिनंदन केले आहे.