पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील….. बिब्ब घ्या, बिब्ब्- शिक्के काई वसुलदारांची हिटलरशाही चालायाची न्हाई
पुणे/दि/ प्रतिनिधी/
सुया
घे, पोत घे, वाळ घे, मनगटी घे बाईऽऽ, बिब्ब- शिक्क- रिठं हाईत बाई ऽऽऽ अस्सं म्हणुन
कटलरी मालाची विक्री तत्कालिन काळात पुण्यासह राज्यात होत होती. सध्या ऍमेझॉन किंवा
इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशात शिरकाव केल्यापासून वैदू किंवा वैदिणीच्या ह्या
व्यवसायावर संक्रांत आली आहे. परंतु मागील हजार पाचशे वर्षांपासून हा व्यवसाय त्यांच्याकडंच
होता. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्या व्यवसायात बिब्ब घालण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू
केलं आहे. ह्या वस्तु एकतर वैदिणीकडे मिळायच्या किंवा आठवडी बाजार किंवा गावगावच्या
जत्रमध्येच ह्या वस्तु मिळत असतं. आता मात्र सर्वत्र कटलरी मालाची दुकाने झाली आहेत
हा भाग वेगळा. परंतु सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयाची देखील अशीच काहीशी अवस्था झाली
आहे. पुणे शहर पोलीस...







