पिकल्या पानाचा, देठ की हो हिरवाऽऽऽ
पुणे- खडकी/दि/
खडकी
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व गैर कारभाराबाबत थेटच गृहमंत्रालयापर्यंत अनेक तक्रारी
गेलेल्या आहेत. आपले सरकार पोर्टलपासून ते लोकायुक्तापर्यंत प्रतित्रापत्राव्दारे तक्रारी
केल्याने, सध्या खडकीतील अवैध व गैरधंदे अंशतः चालु आहे. सध्या मोहित्यांसारखे वरीष्ठ
पोलीस निरीक्षक आल्याने त्यांना काबूत ठेवण्याची कला अजून एकाही वसूलदाराकडे नाहीये.
त्यामुळे त्यांचा शब्द म्हणजे शब्दच. बंद म्हणजे बंदच. त्यामुळे सध्या खडकी बंद असली तरी अप्पा बंद ठेवतील
तर नवलच. पिकल्या पानाचा देठ कीहो हिरवा...असे सांगण्यात येते की, सध्या काळा बाजार
बंद असला तरी अप्पा पान टपर्यांवरून नियमित वसूली करीत असल्याचे दिसून येत आहे. एका
एका पान टपरीवाल्याकडून पूर्वी अप्पा ३००० हजार रुपये घ्यायचे म्हणे. धंदे बंद...







