टीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड
नवी दिल्ली/दि/ मागील
अनेक दिवसांपासून टीकेचा मारा सहन करत असलेले सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अखेर मौन
सोडत टीकाकारांवर पलटवार केला. न्यायव्यवस्था किंवा व्यवस्थेवर टीका करणे खूप सोपे
आहे. परंतु व्यवस्थेला योग्य दिशेने बदलणे आणि त्यात सातत्य कायम ठेवून ती मजबूत करणे
फार अवघड आहे, असे ते म्हणाले.
७२ व्या
स्वातंत्र्या दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय परिसरात ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर
टीका केल्यानंतर सुमारे ८ महिन्यानंतर न्या. मिश्रा यांनी सार्वजनिक मंचावरून मौन सोडले.
ठोस आणि
मजबूत सुधारणा तर्कसंगतता, परिपक...