Tuesday, January 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/बदलापुर/दि/ प्रतिनिधी/राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान या देशात बदल अपेक्षित असून कर्नाटक मार्ग दाखवून देईल. तसेच 2024 मध्ये बऱ्याच घटना घडतील असंही त्यांनी बदलापुर येथील सभेत वक्तव्य केले आहे.यावेळी ते म्हणाले की, मी कित्येकवेळा सांगितले आहे की, या राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, हे सरड्यासारखे कधी कलर बदलतील हे सांगता येणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नावे हे केवळ एक कलर दाखविण्यासाठी आहे. परंतु यांचा असणारा खरा कलर आत्ता दिसायला लागला आहे. आज जातील की उद्या जातील, की परवा जातील अशी चर्चा आपणांस दिसते. 2024 च्या अगोदर बऱ्याच घटना याच्या अगोदर घडणार आहेत. कदाचित कर्नाटक हा मार्ग दाखवु शकतो. या देशाला बदल अपेक्षित आहे. फक्त बदलाचे शब्द ठरेल आणि त्याचा हुंकार हा पण झाला पाह...
अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी केसेस काढून घेण्यासाठीच : बाळासाहेब आंबेडकर

अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी केसेस काढून घेण्यासाठीच : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/बदलापुर/दि/ प्रतिनिधी/स्वतःवरील केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. बदलापूरमधील एका कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. यावेही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, आरएसएसवर जोरदार टीका केली. सोबतच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसह बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरही वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी अजित पवारांविषयी बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, अजित पवार यांचं कौतुक केलं की त्यांनी त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यासाठी शपथविधी करुन घेतला. आपल्या केसेस विड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले. राष्ट्रवादीने फसवणूक केली, सरड्यासारखा रंग बदलते -यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका के...
कलम 353 चा पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांकडून दुरूपयोग<br>आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर कलम 353 चा सर्रास वापर

कलम 353 चा पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांकडून दुरूपयोग
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर कलम 353 चा सर्रास वापर

राजकीय
पुणे/दि/नॅशनल फोरम/शिवाजीनगर मार्गावरील एका पीएमपीएमएल बसने पुरम चौकात सिग्नल लागल्याने समोर असलेल्या कारला पाठीमागुन धडक दिली. कारमधील इसमांनी संबंधित बस चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. म्हणून कारचा चालक तसेच इतर तीन इसमांविरूद्ध भादवी 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना कोंढवा येथील असून पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील कर्मचारी मिळकतीच्या जप्तीचे वॉरंटची बजावणी करीत असतांना, मिळकतकर धारक संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर धावुन येऊन अपशब्द वापरल्याने संबंधित नागरीकावर शासकीय कामात अडथळा केला म्हणून त्याच्या विरूद्ध भादवी 353 चा गुन्हा दाखल केला आहे. तिसरी घटना- पुणे महापालिकेवर दलित पँथरच्या मोर्चाव्दारे पारधी समाजाच्या न्याय मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यासाठी जात असतांना, महापालिका आवारात असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राष्ट्रपिता महात्मा फुलेंचा व...
पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आघाडीचा धर्म राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी पाळला का….

पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आघाडीचा धर्म राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी पाळला का….

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड मध्ये काल झालेल्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात आघाडीचा धर्म पाळला आहे काय असा सवाल काही कार्यकर्ते व्यक्त करू लागले असल्याचे दिसून येत आहे. काल दुपारी साडेबारावाजेपर्यंत पिंपरी मतदारसंघातील भोसरी व चिंचवड येथे बहुतांश भाजपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काम करीत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी निरीक्षण नोंदविले आहे. शिवाय पुण्यातील कसबा पेठेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपासाठी मतदान करण्यासाठी नागरीकांना पुढे पाठवित असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला आहे काय अशी शंका निर्माण झाली आहे. दोन्ही मतदारसंघात 40 ते 45 टक्के मतदान झाले आहे. सकाळी आम्ही कसब्यात असतांना दुपारी 12 वाजेपर्यंत काही मतदारसंघात 8 ते 12 टक्के मतदान झाले होते. भाजपा व काँग्...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

राजकीय
काँग्रेसची अवस्था आजही जुन्या जमिनदारासारखी आहे पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसनेच अधिक काळ देशात व महाराष्ट्रात सत्ता उपभोगली आहे. देशातील व राज्यातील बहुजन समाजाला सत्तेत येऊ दिले नाही. यांनीच राज्य केलं. त्यामुळेच राज्यात 3/4 वेळेस काँग्रेसला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता देखील बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आंबेडकरी समुह व बहुजन समाजाची या पक्षांना मते हवीत परंतु या समाजांना सत्तेत वाटा दयायचा नाहीये. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गळयात आणि गाडीवर निळे झेंडे लावुन फिरत आहेत. दोन्ही काँग्रेसवाले कुणाला विचारून निळे झेंडे वापरत आहेत असा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाज...
कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

राजकीय
नाशिक/दि/पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्याम...
नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/नोटबंदीचा निर्णय वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून आता बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असाही सवाल उपस्थित केला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 10 मार्च 2017 रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने 2016 च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात आणणे किंवा नोटबंदी करणे यामध्ये केंद्र सरकारने काय भूमिका घ्यावी याविषयीच्या संवैधानिक मुद्यावर अपेक्ष...
दलितांवरील अत्याचाराबाबत पुणे शहर पोलीसांचे कर्मठ जातीयवादयांसोबत संगनमत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दलित- पिडीतांना न्यायासाठी आंदोलन करावे लागत असल्याची दुर्देवी बाब…

दलितांवरील अत्याचाराबाबत पुणे शहर पोलीसांचे कर्मठ जातीयवादयांसोबत संगनमत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दलित- पिडीतांना न्यायासाठी आंदोलन करावे लागत असल्याची दुर्देवी बाब…

राजकीय
पुणे/दि/ नॅशनल फोरम/स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील अनु. जाती, जमाती, अर्थात दलित व आदिवासी पिडीतांना पोलीस न्याय देत नाहीत. उलटपक्षी कर्मठ जातीयवादयांबरोबर संगनमत करून, अत्याचाराला उत्तेजना देण्याचे काम केले जात आहे. पुणे शहर पोलीस दलातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दोन जातीय अत्याचाराच्या घटना घडलेल्या असतांना देखील पोलीस त्यांचे कायदेशिर कर्तव्य पार पाडत नाहीत. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कर्मठ जातीयवादी श्री. रमेश खामकर याचे विरूद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होवून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळुन देखील श्री. खामकर यांना सपोआ विश्रामबाग अटक करीत नाहीत. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे श्री. राकेश विटकर यांच्या विरूद्ध ॲट्रॉसिटीची फिर्याद दाखल होवूनही गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. थोडक्यात पोलीस त्यांचे कायदेशिर कर्तव्य बजावित नसल्याने, आजही आम्हाला जिल...
पुणे महापालिकेवर नॉन-स्टॉप 28 व्या दिवशीही कडाक्याच्या थंडीत बेमूदत धरणे आंदोलन सुरू

पुणे महापालिकेवर नॉन-स्टॉप 28 व्या दिवशीही कडाक्याच्या थंडीत बेमूदत धरणे आंदोलन सुरू

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश व्दारावर संविधान परिषदेच्या वतीने आजच्या आंदोलनाचा 28 वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत आणि अवकाळी पावसातही धरणे आंदोलन सुरू आहे. पुणे महापालिकेतील विधी विभाग, कामगार कल्याण विभाग, सामान्य प्रशासन आणि बांधकाम विभागात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची चौकशी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य सरन्यायाधिशांमार्फत होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संविधान परिषदेच्या वतीने करण्यात आलेला आहे. दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी पासून पुणे महापालिकेच्या प्रवेश व्दारावर हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने देखील ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या, त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. बहुतांश कर्मचारी त्यांच्या बदलीच्या जागी रूजु होत असल्याचे खात्रीलायक वृ...
पुणे महापालिकेच्या बाहेर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा इफेक्ट

पुणे महापालिकेच्या बाहेर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा इफेक्ट

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे महापालिकेच्या बाहेर संविधान परिषदेच्या वतीने बेमूदत तीव्र धरणे आंदोलन मागील 20 दिवसांपासून सुरू आहे. या धरणे आंदोलनामुळे नेमकं काय साध्य झालं आहे किंवा होणार आहे… महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. सर्व अधिकारी गेंड्याच्या कातड्याचे आहेत, त्यामुळे त्यांच्यात काहीच सुधारणा होणार नाही असे अनेक कार्यकर्ते आपले मत व्यक्त करीत आहेत. तथापी पुणे महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती आमच्या समोर आणली आहे.या सर्व आंदोलनामुळे 1. कामगार कल्याण विभाग व मुख्य कामगार कल्याण अधिकारी श्री. दौंडकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण बालगंधर्व येथे घेतले असून, कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय यांचा लाभ कसा दयावा तसेच 2015 साली ज्यासाठी समिती नियुक्त केली, त्याच्या शिफारशीनुसार ह्या मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. काल शुक्रव...