Friday, April 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आघाडीचा धर्म राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी पाळला का….

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड मध्ये काल झालेल्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात आघाडीचा धर्म पाळला आहे काय असा सवाल काही कार्यकर्ते व्यक्त करू लागले असल्याचे दिसून येत आहे. काल दुपारी साडेबारावाजेपर्यंत पिंपरी मतदारसंघातील भोसरी व चिंचवड येथे बहुतांश भाजपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काम करीत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी निरीक्षण नोंदविले आहे. शिवाय पुण्यातील कसबा पेठेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपासाठी मतदान करण्यासाठी नागरीकांना पुढे पाठवित असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला आहे काय अशी शंका निर्माण झाली आहे.


दोन्ही मतदारसंघात 40 ते 45 टक्के मतदान झाले आहे. सकाळी आम्ही कसब्यात असतांना दुपारी 12 वाजेपर्यंत काही मतदारसंघात 8 ते 12 टक्के मतदान झाले होते. भाजपा व काँग्रेस उमेदवारांच्या महापालिका प्रभागात 15 ते 18 टक्के मतदान झाल्याचे दिसून येत होते. त्यातच दुपार नंतर मात्र कसब्यात जोर वाढला. भाजपा आणि काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. परंतु राष्ट्रवादीचे नेते कुठे गायब झाले होते, त्यांचे त्यांनाच ठाऊक. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्यात कमळासाठी अधिक प्रयत्न केले असल्याचे ऐकण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर वास्तव समजणार आहे. तथापी प्रस्थापित भाजपा सरकारविषयी नागरीकांच्या मनांत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कसब्यात परिवर्तन होणार याविषयी अनेकांनी मत व्यक्त केले आहे. सकाळी 11 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पारंपारीकपणे वंचित आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर खापर फोडून मोकळे झाले आहेत. त्यामुळेच आम्ही साडेबाराच्या सुमारास राष्ट्रवादीने केलेले कृत्य बाहेर काढले होते. आता सर्व निकालावर अवलंबुन आहे. निकाल धक्कादायक व वास्तवादी असेल यात शंकाच नाही.