Saturday, May 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: national forum

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय व अतिक्रमण विभाग यांच्या संमनमतातून, मार्केटयार्ड रोडवर अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण धारकांची मुजोरी वाढली.

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय व अतिक्रमण विभाग यांच्या संमनमतातून, मार्केटयार्ड रोडवर अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण धारकांची मुजोरी वाढली.

शासन यंत्रणा
marketyard-illagal अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण विरोधात बांधकाम विभागाचा हातोडा, २४ तास उलटण्याच्या आतच अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत. पुणे/दि/ प्रतिनिधी/      श्रीमंत, धनाढ्यांना पैशाची एवढी मुजोरी चढली आहे की, गरीबांना अधिकाधिक पिळून काढायचे, त्यांच्या धामाच्या- कष्टावर अधिकाधिक आक्रस्ताळेपणा करून स्वतःच्या संपदेमध्ये वाढ करण्याकडे अधिक कल वाढला आहे. पुण्यातील आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठ रोडवर याच धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. धनदांडग्यांचा हा कब्जा बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण विभागाच्या संगनमतातून हा सर्व कारभार सुरू आहे. सध्या बेरोजगारीचा स्फोट होण्याची वेळ आली असतांना, इथली शासन यंत्रणा भांडवलदारांच्या  पायावर लोळण घेत आहे.  बेरोजगारी, उपासमारीने त्रासलेला वंचित, शोषित वर्ग न्यायिक हक्कासाठी बंड करून मुजोरांना चाप लावण्याऐवजी आपआप...
प्रस्थापित प्रसार माध्यमांकडून वंचित बहुजन समाजातील उमेदवारांच्या बातम्या देणं बंद  ५०० लोकांच्या सभेचं उदोउदो… ५ लाखांच्या सभेची चार ओळीची बातमीही नाही… वाऽऽ रे माध्यमं

प्रस्थापित प्रसार माध्यमांकडून वंचित बहुजन समाजातील उमेदवारांच्या बातम्या देणं बंद ५०० लोकांच्या सभेचं उदोउदो… ५ लाखांच्या सभेची चार ओळीची बातमीही नाही… वाऽऽ रे माध्यमं

सर्व साधारण
wanchit aghadi pune पुणे/दि/ प्रतिनिधी/ भारतातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीया हा जातीयवादी स्वरूपाचा होता आणि आहे यात तिळमात्र शंका घेण्याचे कारण राहिले नाही. संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणूका सुरू आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी सेना या प्रस्थापित व घराणेशाहीच्या पक्षा व्यतिरिक्त या देशात इतरही तुल्यबळ पक्ष संघटना आहेत. परंतु जशी निवडणूक जाहीर झाली आहे, त्या दिवसांपासून प्रस्थापित पक्षांव्यतिरिक्त कोणत्याही पक्षांच्या प्रचार सभांची बातमी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीयातून दिसून येत नसल्याची बाब दिसून येत आहे. प्रस्थापित पक्षांच्या निवडणूक सभेला काही ठिकाणी अवघे पाचशे ते पाच हजारापर्यंत लोक हजर असतांना त्याची मोठ मोठ्याला कॉलमची बातमी केली जात आहे, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या सभेला दोन लाख, पाच लाखांच्या सभा होत असतांना, त्यांची एक कॉलमचीही बातमी कुठे आढळुन येत नाही क...

युपीएससीत महाराष्ट्राचे ९० जण चमकले. पुजा मुळ्ये राज्यात पहिली, तर तृप्ती धोडमिसे दुसरी दलित समाजाचा कनिष्क कटारिया देशातून पहिला, मध्य प्रदेशची सृष्टी देशमुख देशातून पाचवी, सातारच्या तीन युवकांनीही मारली बाजी

सामाजिक
मुंबई/दि/ केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन २०१८ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया या दलित तरूणाने देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे, तर मध्य प्रदेशची सृष्टी देशमुख ही देशातून पाचवी व महिलांमधून पहिली आली आहे. महाराष्ट्रातून पुजा मुळ्ये हिने पहिला (देशातून ११ वा) क्रमांक पटकावला आहे. तृप्ती धोडमिसे हिने राज्यातून दुसरा व देशातून सोळावा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ९० तरूणांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यात ७० जणांनी युनिक अकॅडमीकडून प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्रातून पहिल्या स्थानावर असलेली पुजा मुळ्ये ही निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या आहे. वडिलांप्रमाणेच तिनेही प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे. आपल्या मुलीच्या या यशाचे ज्ञानेश्वर मुळे यांनी फेसबुकवरून कौतुक केले. महा...
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची शहरात जोरदार कारवाई, मुजोर दुकानदार, व्यापार्‍यांची बेकायदा अतिक्रमणे हटविली.

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची शहरात जोरदार कारवाई, मुजोर दुकानदार, व्यापार्‍यांची बेकायदा अतिक्रमणे हटविली.

शासन यंत्रणा
karwai pmc market yard पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे, शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील दुकानदार व व्यापार्‍यांनी मनमानीपणे दुकानाच्या पुढे पाच/दहा/१५ फुटांचे बेकायदा अतिक्रमण करून, पदपथावरून चालणार्‍यांना नेहमीचा अडथळा ठरत होता. अशा मुजोर दुकानदार व व्यापार्‍यांविरूद्ध पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. पुण्यातील सर्व पेठा तसेच लगतच्या उपरात मोठे दुकानदार व व्यापार्‍यांनी राजकीय आश्रयाचा वापर करून, बेकायदा अतिक्रमणे करणे सातत्याने सुरू ठेवले होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्मिाण होवून, वाहतुक कोंडी सातत्याने होत आहे. यावर पुणे महापालिकेतील अतिक्रमण विभागाने कारवाई सत्र करून, शहरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. पथारी व्यावसायिकांची हातचलाखी - मागील पाच/दहा वर्षांपासून पथारी व्यावसायिकांच्या संदर्...
पुण्यातील सा.बां. मंडळातील वर्ग ३ च्या कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेत पळापळ, पदोन्नती झाली तरी विभागात कार्यरत राहण्याचा संकल्प

पुण्यातील सा.बां. मंडळातील वर्ग ३ च्या कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेत पळापळ, पदोन्नती झाली तरी विभागात कार्यरत राहण्याचा संकल्प

सर्व साधारण
pwd pune पुणे/दि/ प्रतिनिधी/ शासन म्हणजे स्वयंसेवा संस्था, मुळीच नाही. आणि स्वायत्त संस्था मुळीच नाही. शासन मंत्रालय, जिल्हे, तालुके आणि अतिदुर्गम भागापर्यंत याचा निरंतर वास. लोक सेवेसाठी राबणारे लोकसेवकांचा इथ राबता असतो. वेतन पगारासंबंधी विचारता काय… वा छान…. पगार नसेल तर कोण लोकसेवेसाठी झटेल… अहो, फुकटांत देवाला कोणी नमस्कार म्हणत नाही. असा. ज्याची त्याची भक्ती. कोणाची देवावर भक्ती कोणाची नैवेद्यावर भक्ती छान… बदली प्रकाराला तड लागली आहे. देवाच्या देवळात नैवेद्य आहे पण नैवेद्यावर ध्यान ठेवणार्‍या स्वार्थी, लबाड भक्ताला हद्दपार करण्यासाठी बदली ऍक्ट नाही. पण शासनात आहे. शासनाला कोणी नावे ठेवत नाही. तर शासनातील यंत्रणेला नकारात्कदृष्ट्या वा सकारात्मदृष्ट्या जनता नावे ठेवत असते. हा बदली ऍक्ट शासनात आहे. कार्यरत असलेला प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्या सततच्या एकाच कार्यपद्धतीन...

गत सात वर्षात १५ कोटी लोकांचा रोजगार गेला

सामाजिक
नवी दिल्ली /दि/ . मागील सात वर्षांमध्ये तब्बल १५ कोटी लोकांनी रोजगार गमावला असून यामध्ये ७.३ टक्के पुरुष मजूर आणि ३.३ टक्के महिलांचा समावेश आहे. ही धक्कादायक माहिती पीरिओडिक लेबर फोर्स सर्वेमध्ये (पीएलएफएस) समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची नुकसान भरपाई करण्यासाठी शहरांमध्येही रोजगार वाढला नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कामगार क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसंदर्भात २०१७-१८ चा पीएलएफएस सर्वे नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार घरकाम व शेतमजुरीतून मिळणार्‍या रोजगाराच्या संख्येत कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना मोठया प्रमाणात शेतीतून रोजगार मिळत असून त्याचे उत्पन्नही चांगले आहेत. पण, ग्रामीण भागातील अशा उत्पन्नामध्येही १० टक्क्याने घट झाली आहे. २०११-१२ मध्ये शेतमजुरीतून उत्पन्न मिळवणार्या कामगारांचे प्रमाण २१ टक्के होते. आता ते प्रमाण १२.१...
बिबवेवाडी येथील हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न

बिबवेवाडी येथील हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न

सामाजिक
पुणे/दि/ रिजवान शेख/ पुण्यातील स्वारगेट- बिबवेवाडी परिसरातील प्रसिद्ध हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न झाला. यावेळी शहर व उपनगरातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी संदल, ऊर्स शरिफ व जियारत अशा तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याच्या ऊरूसाच्या पहिला दिवशी संदल हा कार्यक्रम पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी हजरत राजा बागशहा शेर सवार यांना संदल लावण्यात आला. तसेच पारंपारिक वाद्य वाजवुन मिरवणूक काढण्यात आली. दुसर्‍या दिवशी ऊर्स शरीफ व तिसर्‍या दिवशी जियारत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सार्वजनिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाच ते सात हजार नागरीकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. बिबवेवाडी येथील हजरत राजा बागशहा शेर सवार हा दर्गा प्रसिद्ध असून, पुणे शहरासह विविध भागातून ...
तुमच्या पक्षाचे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच विचार करू

तुमच्या पक्षाचे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच विचार करू

राजकीय
सोलापूर : ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची चर्चा आहे.     सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या संघटनासाठी नेत्यांनी गावोगावी बैठका घेण्यात सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता लाखोंची गर्दी जमवायची कशी, असा पेच जानकर आणि आठवले यांच्यापुढे निर्माण झाल्याची चर्चा आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने रिपब्लिकन पक्षाला दिलेली आश्‍वासने न पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.     जानकर यांनी धनगर आरक्षणासाठी सरकार दरबारी काहीच हालचाली केल्या ...
वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर, सर्वाधिक धनगरांना ६ जागा, बौद्धांसह २१ जातींना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर, सर्वाधिक धनगरांना ६ जागा, बौद्धांसह २१ जातींना उमेदवारी

राजकीय
Prakash-Ambedkar मुंबई/दि/ प्रतिनिधी/     मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या रेकॉर्डब्रेक जाहीर सभा झाल्या.लोकसभा निवडणूकीच्या तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवार निश्‍चित केले. दरम्यान मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वेगवेगळ्या समाजाला सत्तेच्या जवळ नेण्याची महत्वकांक्षा बाळगलेल्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपली पहिली यादी जाहीर केली. जाहीर केलेले उमेदवार हे महाराष्ट्रातील त्या त्या जिल्ह्यात वर्षानुवर्षे राजकीय सामाजिक क्षेत्रात कामे करीत आलेली आहेत. परंतु त्यांना संधी मात्र कोणत्याही पक्षाने दिली नाही. अशाच उमेदवारांना बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे.     तब्बल ३६ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१  व...
घराणेशाहीचे राजकारण!

घराणेशाहीचे राजकारण!

सामाजिक
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थाने खालसा झाली आणि देशात लोकशाही व्यवस्था लागू झाली. म्हणजे राजेशाही गेली आणि लोकशाही व्यवस्था आली. खालसा झालेल्या संस्थानातील काही राजे-महाराजे पुढे भारतीय राजकारणात उतरून लोकशाही व्यवस्थेचे अंग बनले. या राजघराण्यांमधील वारसदारांवर देशाच्या सर्वच भागांतील नागरिकांनी मोठा विश्वास ठेवला. काही मोजक्या राजघराण्यांनी जनता आणि राजा यांच्यातील अंतर कधी वाढू दिले नाही. आपला राजा आपल्यासाठीच झटणार, हा सामान्यांच्या मनातील विश्वास काहींनी वर्षानुवर्ष टिकवून ठेवला व त्यातूनच त्यांच्या कार्याची ओळख अधोरेखित होत गेली; परंतु देशभरातील बहुतांश राजे-महाराजे आणि त्यांचे राजकीय वारसदार यांचा शाही थाट पाहिला, त्या राजाच्या कार्यक्षेत्रातील प्रजेचे दुर्दैवाचे दशावतार पाहिले की, राजा आणि प्रजा यांच्यातील अंतर प्रकर्षाने नजरेस भरते.     राजघराण्यांचे ...