कोंढवा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याने पोसलेल्या सांडांची पुणे महापालिकेत झुंडशाही
अगरवाल व हुसेन पठाण या बेकायदा बांधकामाच्या टोळीविरोधात पोलीस महासंचालक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली महापालिका आयुक्त व शहर अभियंता कार्यालयाच्या कुंभकर्ण झोपेमुळे पुण्यातील पेठांचे उध्वस्तीकरण पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/ पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावानं पोलीस आयुक्तालयात दिवस-रात्र धोसरा काढला जातो. गुन्हेगारांवर नियंत्रण, गैरवाजवी वाहतुकीवर सनियंत्रण ही तर पोलीस ड्युटी तक्त्यावर नियमित छापलेलं ब्रिदवाक्यच. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, पोलीसांची ना गुन्हेगारांवर पाळत, ना वाहतुकीवर नियंत्रण अशी आजची अवस्था पुणे शहर पोलीसांची झाली आहे. नागरीक व संघटनांकडून एखाद्या गुन्हेगाराबाबत तक्रार अर्ज आल्यास, त्यावर कार्यवाही केली जातच नाही. एका पोलीस स्टेशन मधुन दुसर्या पोलीस ठाण्यात व दुसर्या पोलीस ठाण्यातून पहिल्या पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाचा प्रवास सुरू असतो. महिलांची सुरक्ष...






