बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील निविदा कामांतील भ्रष्टाचाराची चौकशी करा
पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील निविदा कामांतील भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून सह महापालिका आयुक्त अर्थात क्षेत्रिय अधिकार्यांना बडतर्फ करण्याची मागणी विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत माहिती समजते की, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३६ मधील डॉ. आंबेडकर नगर व प्रेमनगर या मार्केटयार्ड येथील वसाहतींमध्ये वेगवेगळी निविदा कामे काढण्यात आली आहे. यामध्ये सुलभ शौचालय दुरूस्ती, वसाहतीत सिमेंट कॉंक्रीट करणे, डे्रनेज लाईन दुरूस्ती आदी कामांचा समावेश आहे. मार्केटयार्ड आंबेडकरनगर येथे तर अस्तित्वात नसलेल्या शौचालयाची दुरूस्ती केल्याचे दाखविण्यात आले आहे. मार्केटयार्ड आंबेडकरनगर येथे एकुण चार सुलभ शौचालये आहेत. या चारही सुलभ शौचालयांची दुरूस्ती करण्यात आली असल्याचे निविदेतील कागदपत्रे, एमबी व फोटोवरू...









