
सावरकर भवन मध्ये अघोरी पुजा- तांत्रिक मांत्रिक गंडे दोरेचा प्रकार –
pmc bandhakam 2022
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात अमुलाग्र सुधारणा,बांधकाम झोन 7 मधील झुंडशाहीचे अतिक्रमण मोडून काढले,
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात सातत्याने ठिय्या मारून बसलेल्या दगडी नागोबांना सध्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असून, झुंडशाहीचे अतिक्रमण बऱ्यापैकी मोडून काढले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगातभिनलेला रेसवटपणा मंगळवारच्या बैठकीतून काढुन टाकला जात आहे, त्यानंतर स्वतः अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वात सातत्याने कार्यालयीन बैठका घेण्याचा पायंडा पाडला जात आहे. या माध्यमातून अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेतच शिवाय नागरीक, माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते- पुढारी मंडळी, नगरसेवक आणि आमदार - नामदारांच्याही अर्जांवर तातडीने कार्यवाही केली जात आहे, टपाल आणि प्रकरणांच्या निर्गतीचे ...