Saturday, May 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहतीतील भाईगिरी ,आमच्या भांडणामध्ये कुणी पडायच नाय, आम्हीच इथले भाई, आमच्या मध्ये कुणी आले तर त्यालाही संपवून टाकु

पुणे/दि/नॅशनल फोरम/
आम्हीच जनता वसाहतचे भाई असून, आम्हीच इथे राज्य करणार, तसेच आमच्या पोरांना कोयत्याने मारताय काय, तुम्हाला आता खल्लास करून टाकतो, आता यांना सोडायचे नाही. आमच्या भांडणात कुणी पडायचं नाही आम्हीच इथले भाई आहोत, आमच्या मध्ये कुणी आले तर त्यालाही संपवून टाकु हा मुळशी पॅटर्न चित्रपटातील डायलॉग नसून, पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या जनता वसाहतीमध्ये सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेली वास्तवातील घटना आहे.


जनता वसाहती मधील एक अल्पवयीन मुलगी व त्यांचा मित्र ओम श्रीनाथ अमृततुल्य पर्वती गाव येथुन चहा पिऊन मोटार साखकलवरून विठ्ठल मंदिर, जनता वसाहत पर्वती येथे येत असतांना यातील एकुण सात इसमांनी जुन्या भांडणाचा राग मनांत धरून, त्यांच्याकउील मोटार सायकल ही फिर्यादीच्या गाडीस आडवी घालुन आम्हीच जनता वसाहतचे भाई असून, आम्हीच इथे राज्य करणार, तसेच आमच्या पोरांना कोयत्याने मारताय काय, तुम्हाला आता खल्लास करून टाकतो, आता यांना सोडायचे नाही असे बोलून फिर्यादी व त्यांचे मित्रांना शिवीगाळ व दमदाटी करून लोंखडी कोयते व लाकडे बांबु हातात घेवून बेकायदेशिर जमाव जमा करून कोयता फिर्यादीस फेकुन मारला. त्यावेही तो कोयता चुकवत असतांना फिर्यादी हे खाली पडले. त्यानंतर लोखंडी कोयत्याने फियादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडे बांबुने मारहाण करून, त्याच्या डोक्यात व कंबरेवर लोखंडी कोयत्याने वार करून, त्यांना गंभिर जखमी करून ठार मारण्याचा प्रकार जनता वसाहतीतील गल्ली नं. २२ वरील मुस्कान ब्युटी पार्लर समोरील मुख्य रस्त्यावर घडली आहे.
याच वेळी मुळशी पॅटर्न सारखा थरार सुरू असतांना, बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच वेळी एकाने हातात कोयता नाचवत म्हणाला की, आमच्या भांडणात कुणी पडायचं नाही आम्हीच इथले भाई आहोत, आमच्या मध्ये कुणी आले तर त्यालाही संपवून टाकु त्यामुळे जमलेली बघ्याची गर्दी सैरावैरा पळत सुटली. तर काही लोकांनी आप आपल्या घराचे दारे व खिडक्या बंद करून घेतल्या. झालेल्या गुन्ह्याची नोंद दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आली असून अधिकचा तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. सिद्धनाथ खांडेकर करीत आहेत.