
पुणे महानगरपालिकेचे मागील 15 वर्षांपासून जमा आणि खर्चाचे ऑडीट नाहीच… अनुभवी कर्मचाऱ्या अभावी, हिशोबाची विल्हेवाट
पुणे/दि/ प्रतिनिधी/National Forumपुणे महानगरपालिकेने मागील 15 वर्षात जमा आणि खर्चाचे ऑडीट केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रजिस्टर नुसार जमा खर्च व बँक पास बुकानुसार जमा खर्चाचा ताळेबंद केला जात नसल्याचेही समोर आले आहे. मुळात एवढं किचकट काम करणारा अनुभवी अधिकारी कर्मचारी नसल्यामुळेच आजपर्यंत ऑडीट झाले नसल्याचेही समोर आले आहे. पुणे महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. कोणत्याही तक्रार अर्जांवर किंवा बातमीवर साधा विचारही केला जात नाही. अतिशय मनमानी पद्धतीने पुणे महापालिकेचा कारभार सुरू असल्याने या गंभिर विषयावर साधी चर्चा करण्यास देखील कुणी तयार नसल्याचे दिसून आले आहे.
पुणे महापालिकेत मुख्य लेखापाल व ऑडीट विभाग कार्यरत आहेत. परंतु दोन्ही खात्यात अनुभवी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. वर्ग 3 चा कर्मचारी वर्ग एक मध्ये रातोरात मंत्रालयातून आदेश घेवून येत असतील तर अन...