Saturday, August 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुणे महापालिकेतील सुपणार आणि घनकचरा स्कॅमची विधीमंडळात लक्षवेधी व प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता!

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेतील गार्बेज स्कॅम काय आहे, सुपणार कोण आहेत,कंत्राटी नोकर भरती प्रकरण काय आहे, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सोशलमिडीयाव्दारे होत आहे. त्यातच पुणे शहरातील काही नगरसेवक, नगरसेवकांचे नम्रकारी, आमदार व एका महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच कृषी खात्यातील एक एसडीओ यांनी प्रत्यक्ष भेट घेवून, हा विषय समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच याबाबत नेमके काय पुरावे उपलब्ध आहेत, त्याचीही विचारणा केली आहे. तसेच विधीमंडळात लक्षवेधी व प्रश्न उपस्थित करण्याबाबत सुतोवाच केला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील गार्बेज स्कॅम व आशिष सुपणार यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार राज्याच्या चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.

दरम्यान सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक आशिष माणिक सुपणार यांनी केलेली कंत्राटी नोकरभरती, तसेच राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी दिलेले निवेदन, सुपणार यांची बदली व बदलीसाठी मेडीकल रजेचा केलेला गैरवापर, त्यावर न झालेली चौकशी, उपआयुक्त घनकचरा यांनी सुपणार यांच्याबाबत चौकशीत दाखविलेली उदासिनता यामुळे पुणे महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसानीस नेमके कोणते अधिकारी जबाबदार आहेत अशी विचारणा केली असता, उपलब्ध झालेल्या कागदपत्रानुसार, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे तत्कालिन 1) प्रशासन अधिकारी व आजचे सहायक महापालिका आयुक्त  तिमय्या जंगले, 2) वरिष्ठ लिपिक बाळासाहेब कोंढाळकर, 3) धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विक्रम काथवटे, 4) राज्य शासनाच्या प्रतिनियुक्तीवरील एक महिला अधिकारी व सध्या कार्यरत 5) उपअभियंता तथा सहा. महापालिका आयुक्त श्री. वाघमोडे यांनी सुपणार हेच सुपणार यांनी केलेल्या फौजदारीपात्र कटात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. 


मूळातच पुणे महापालिकेतील घनकचरा विभागात प्रत्येक प्रकरणांची इतकी गुंतागुंत आहे की,  घनकचरा हा विभाग नेमका काय आहे याची नवीन नियुक्ती केलेल्या सहायक महापालिका आयुक्त व उपआयुक्तांनाही लवकर समजत नाही. झाडणकाम, झाडणकामाचे ठेकेदार, कचरा वाहतुक, कचरा संकलन, कचऱ्याचे वर्गीकरण, बल्क वेस्ट, कचरा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, बायोमायनिंग इत्यादी... इत्यादी विषयक अतिशय किचकट आहेत. त्यातच झाडणकामाचे ठेकेदार हे निव्वळ कामगार पुरवितात. परंतु त्या कामगारांची हजेरी, गैरहजेरी, रजा यासह त्यांची दरमहिन्याच्या पगारासाठी पाठविण्याची हजेरी यात कमालिची गुंतागुंत आहे. त्यात कुणा एकावर जबाबदारी येत नाही. झाडणकामाची निविदा स्थापत्य विभागाकडून काढली जात असली तरी, त्याचे सर्व नियोजन घनकचरा विभागाकडील सेवकांना करावे लागते. त्यामुळे त्यातही 100 पळवाटा आहेत. पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयात सुपणार सारखे एक दोन सुपणार आहेत. 


ह्याच सुपणारांनी पुणे महापालिकेत आरोग्य निरीक्षकांची संघटना स्थापन केली आहे. पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांची वेतनश्रेणी एस- 10 वरून एस- 13 करण्यात सुपणार यांचा वाटा असल्याचे सांगितले जाते. परंतु सुपणार यांनी प्रत्येक आरोग्य निरीक्षकाकडून मंत्रालयातून वेतनश्रेणी वाढवुन आणण्यासाठी प्रत्येकी 15 ते 25 हजार रुपये असे एकुण 150 आरोग्य निरीक्षकांकडून वसुल केले होते. 15 हजार रुपयांप्रमाणे 150 आरोग्य निरीक्षकांकडून सुमारे 22 लाख 50 हजार रुपये जमा केले होते. पुढे ही रक्कम म्हणे मंत्रालयातील सचिव तसेच पुणे महापालिकेतील आयुक्त, अति. आयुक्त व सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त यांना दिल्याचे आरोग्य निरीक्षकांना सांगितले जात आहे. यातही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून पुढे जावून त्याचाही खुलासा होणार आहे. 


आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार यांनी प्रत्येक प्रकरणांत फौजदारी पात्र कट करून पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान व पुणे महापालिकेची बदनामी केली आहे. त्यामुळे इथुनपुढे किमान 6 महिने व त्यापेक्षा अधिक काळ सुपणार व गार्बेज स्कॅम हा विषय चालणार यात शंकाच नाही.