Saturday, January 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: vbapune

राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली असल्याची माहिती प्रबुद्ध भारतने प्रसारित केली आहे. प्रबुद्ध भारतच्या वृत्तात नमूद केले आहे की, आमच्या सुत्रानुसार हे निमंत्रण फक्त ‘भारत जोडो न्याय यात्रे'साठी आहे, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेले नाही. वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यात तीन वेळा काँग्रेस हायकमांडला पत्र लिहले होते. जर काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केले, तर राज्यात भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड होईल असेही त्या वृत्तात नमूद केले आहे....
नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची टीका !

नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची टीका !

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आमची बाळासाहेब आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे, जागावाटप अजून ठरलेलं नाही, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीत होईल अशी माहिती नाना पटोले यांनी एका वाहिनीला दिले. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट करत हे खोटे असल्याचे सांगितले. कदाचित बातम्यांमध्ये झळकत राहण्यासाठी नाना पटोले खोटं बोलत आहेत, हे काय पहिल्यांदा घडत नाही तर खोटारडे पणाचा हा पराक्रम झाल्याचे आंबेडकरांनी यात म्हटले आहे. इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात अजून कोणताही कार्यक्रम सुरू झाला नाही, इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत आमंत्रित करण्याबाबत काँग्रेस हायकमांडकडून अजून कोणताही संवाद झाला नाही. तर, मग निमंत्रण न देताच जागावाटपाची कोणतीही चर्चा कशी होणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी ...
बाळासाहेब आंबेडकर म्हणतात…

बाळासाहेब आंबेडकर म्हणतात…

राजकीय
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जम्मु काश्मिर चे 370 कलम व संसद भवनात घुसणाऱ्यांबाबत महत्वाचे विधान केले आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे केवळ एक पक्षाचे अध्यक्ष असले तरी सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक चळवळीशी ते अग्रणी व अपरिहार्य असलेले नेते आहेत. घटनाकारांचे नातू तर आहेतच, परंतु घटनेबाबत केंद्र शासन किंवा न्यायालयाकडून काही मते व निर्णय घेतल्यानंतर, त्याबाबतची वस्तुस्थिती ते जनतेसमोर मांडत आहेत. देशहिताच्या दृष्टीने महत्वाच्या प्रश्नांवर ते सातत्याने बाजु मांडत असतात. जम्मु काश्मिरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले मत कसे चुकीचे व दुरगामी परिणाम करणारे आहे याबाबत त्यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच संसद भवनात घुसणाऱ्या बेरोजगार तरूणांना माफी देवून हा विषय संपवून टाकावा असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारा घटनेत...
“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व 48 जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य ॲड. आंबेडकर यांनी केलं आहे. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, मी या अगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाली नाह...
“वंचितने इंडिया विरोधात उमेदवार देऊ नये”, रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर म्हणाले, “त्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने”

“वंचितने इंडिया विरोधात उमेदवार देऊ नये”, रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर म्हणाले, “त्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने”

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भाजपाप्रणित एनडीएविरोधात देशातले 28 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात तयार केलेल्या आघाडीला ….. (इंडिया) असं नाव दिलं आहे. या आघाडीत महााष्ट्रातले दोन पक्ष सहभागी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या आघाडीचे सदस्य आहेत. परंतु, देशात काही पक्ष असे आहेत जे एनडीएचे सदस्य नाहीत त्याचबरोबर इंडिया आघाडीचेही सदस्य नाहीत. यापैकी काही पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. परंतु, इंडिया आघाडीने त्यांना आघाडीचं निमंत्रण दिलेलं नाही. एमआयएम आणि वंचितच्या काही नेत्यांनी इंडिया आघाडीने त्यांना सामावून घ्यावं अशी इच्छा अनेकदा व्यक्...
वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारताच्या निवडणूक इतिहासातील 2024 ची लोकसभा निवडणूक अगदी वेगळी असणार आहे, अगदी घनघोर राजकीय युद्धच असेल. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडीच्या दृष्टीनेही उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्र महत्त्वाचे ठरणार आहे. देशात राजकीय परिवर्तन घडवून आणायचे असेल तर विरोधकांना, विशेतः काँग्रेसला महाराष्ट्र सर करावा लागेल. मात्र त्यासाठी केवळ राजकीय आघाडी करून चालणार नाही. राज्यात निवडणुकीवर प्रभाव टाकणारे विविध सामाजिक घटक आहेत, त्या राजकीय शक्ती आहेत. ज्यांच्या बाजूने त्या जातील त्यांचा विजय निश्चित आहे, असे आजवरचे निवडणूक निकाल सांगतात. अशांपैकी महाराष्ट्रात वंचित बहुजन समाजाची राजकीय शक्तीचा निवडणुकीवर कायम प्रभाव राहिला आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही तिची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच र...