Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: todaypune crime

पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पोलीस क्राइम
पुणे शहरात खाजगी सावकारांचा धुमाकूळखंडणी विरोधी पथक एक व दोन कडून धडक कारवाईपुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गुन्हेगारी का वाढली आहे… प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या तरुणांच्या हातामध्ये कोयते नेमके कशामुळे आले आहेत… नोकरी नाही… धंदा नाही… व्यापार नाही… तरी या युवकांकडे नवी नवीन गाड्या आणि हातात गळ्यात सोने कसे… याची माहिती घेत असताना खाजगी सावकारी तसेच फायनांशिअल कंपन्या हेच दिसून आले आहे. दरम्यान खाजगी सावकाराने दिलेल्या रकमांची वसुली करण्याकरिता तरुणांच्या हातामध्ये अग्निशस्त्र व धारदार शस्त्र देऊन वसुली करता पाठविले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच भाईगिरी, दादागिरीचा छंद भरलेल्या युवकांना स्फुरण चढले आहे. यामुळेच हातात कोयता घेवून मी देखील भाई म्हणत पुढे येत आहेत. कोयता गँग माफीया गप्प बसले असले तरी कारवाया सुरूच राहणार आहेत. त्यामुळे या खाजगी सावकारी व फायनांशिल कंपन्यांच्य...
पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…

पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…

पोलीस क्राइम
मला आमदार झाल्यासारखं वाटतय…गुन्हेगारांवर कारवाई करतांना पोलीस दलाची पुनर्रचना करणे आवश्यकपुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन… गुटख्यावर धडक कारवाई, ड्रग्जवर हातोडा, सरावलेल्या 3,700 गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई 9 गुन्हेगारी टोळयां मधील 65 गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई 3 गुन्हेगार स्थानबध्द तर 42 गुन्हेगार तडीपार… आता…. आता पुढे….1) खाजगी सावकारी,2) लँड माफिया व रिअल इस्टेट,3) गोल्ड मार्ट व गोल्डन सावकारी4) बांधकाम व्यावसायिक5) दुचाकी, चारचाकी वाहनांचे डिलर,6) फायनान्स कंपन्या व त्यांचे वसुलीचे एजंटआता यांच्यावर कारवाई होणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सलग पाच पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात गुन्हेगार व गुन्हेगारी कृत्यांवर जेवढ्या कारवाया झाल्या नाहीत तेवढ्या कारवाय पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल...
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींविरूद्ध पुणे शहर पोलीस सरसावले,<br>चंदननगर, भारती व गुन्हे युनिट दोन कडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींविरूद्ध पुणे शहर पोलीस सरसावले,
चंदननगर, भारती व गुन्हे युनिट दोन कडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँग आणि अल्पवयीन मुलांकडून शहरात जबरी गुन्हे घडविले जात असल्याचे पुणे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातच पोलीस स्टेशन स्तरावरून फरार आरोपींचा शोध लागत नसल्याची सततची ओरड वरीष्ठांकडून होत होती. पोलीस स्टेशन स्तरावरून गुन्ह्यांचे अन्वेषण होऊन फरार व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत अधिकचे पाऊल उचलले गेल्यामुळे आज पुणे शहरातील जबरी गुन्ह्यातील फरार आरोपी मिळून आले आहेत. पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट 2 यांच्याकडून प्रत्येक एक फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. चंदननगर पोलीस स्टेशन कडून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या -चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस अंमलदार सचिन रणदिवे यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माह...
पुणे पोलीसांवर हल्ला करण्याची सुपारी कुणी दिली ?

पुणे पोलीसांवर हल्ला करण्याची सुपारी कुणी दिली ?

पोलीस क्राइम
pune police attack पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेळेस पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतही तीन/चार पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. पाच सहा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीसांवर हल्ले झाले आहेत. या हल्यामागे नेमके कोण आहे.विमानतळ पोलीस स्टेशन मधील पोलीस अंमलदार श्री. सचिन जगदाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली आहे. त्यात कारण तर काय, श्री. जगदाळे हे नियंत्रण कक्षाकडून फोन आल्यामुळे चायनिज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. परंतु आरोपी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले वय- 24 रा. जिल्हा उस्मानाबाद याला जेवायला मिळाले नाही म्हणून त्याने पोलीसांवर चाकुने हल्ला केला अशी सर्वत्र बातमी प्रसारित झाली आहे. भले… भले… नागरीक आणि गुन्हेगारही पोलीसांपासून चार हात दूर राहतात. त्यात उस्मानाबाद म्हटल्यानंतर तर … पाहुणा ...
बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

पोलीस क्राइम
वाऱ्या वरती रविचंद्राचे झुंबर, सुद्ध हरपती दाही दिशापुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात… पुणे शहर पोलीस आयुक्तालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात्‌‍… जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, जागतिक दर्जाचे ससुन हॉस्पीटल आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, पुणे रेल्वे स्टेशन आहे, रूबी व जहाँगिर सारखी हॉस्पीटल्स आहेत. त्या ठिकाणी ताडीवाला रोड व इतर स्लम परिसर आहे. याच ठिकाणी अवैध जुगाराचा बाजार भरला जातोय, याच ठिकाणी राजाबहाद्दुर मिल्स आवारात यंत्रमागाची धडधड बंद होवून तिथं आता आठ पब मधुन डीस्कोचा धडाधड आवाज धडकत आहे. आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान तर होतच आहे. परंतु हातभट्टी, गांजांची देखील विक्रीचे हब निर्माण व्हावे अशी अतिशय शोकांतिका आहे...
नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद<br>पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/साऊथचे टपोरी चित्रपट, त्यातील जब्बर फायटींग, सोशल मिडीयावरील भाईंच्या वाढदिवसाचे पोस्टर, भाईंना घाबरून जाणारे दुकानदार, बिल्डर यामुळे आता, आपण भाई झालंच पाहिजे असे हल्लीच्या युवकामध्ये नवीन फॅशन तयार झाली असल्यासारखे वातावरण सध्या पुणे शहरात दिसून येत आहे. त्यातच खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. त्याच्या वसुलीसाठी त्यात अशा नवीन तयार होणाऱ्या भाईंना मोठी डिमांड वाढली असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे मोठ्ठा भाई बनण्यासाठी पुणे शहरातील काही पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन भाईंनी तर कायदा आणि पोलीसांचा धाक मुळा मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे वर्तन ठेवले होते. त्यातच हिंदी चित्रपटातील व्हिलन सारखे ड्रग्ज घेतल्यानंतर पॉवर येते की काय असे मनांशी बाळगुन आता शहरात ड्रग्जचेही फॅड अधिक वाढले आहे. परंतु आता नवीन भाईंनो, रस्त्यावर येवून राडा कराल तर पुणे शहर पोलीस नियमितपणे रस्...
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत 6 लाख 50 हजार रुपयांचा गांजा पकडला, अंमली पदार्थ पथक क्र. 2 ची धडक कारवाई

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत 6 लाख 50 हजार रुपयांचा गांजा पकडला, अंमली पदार्थ पथक क्र. 2 ची धडक कारवाई

पोलीस क्राइम
सुनिल थोपटे, योगेश मांढरे व दिगंबर चव्हाण यांची अंमली पदार्थ विरोधातील धडक मोहिम पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँगची दशहत निर्माण झाली आहे. तथापी कोयता, तलवार घेवून नाचणारे नॉर्मल स्थितीतील असल्याचे आढळत नाही. त्यामुळे कोयता किंवा तलवारी हवेत फिरविणारे हे कुठली ना कुठली तरी नशा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यात अंमली पदार्थांचे सेवन हा महत्वाचा भाग असू शकतो असे काही मानसोपचार तज्ज्ञ व डॉक्टरांनी नॅशनल फोरमशी बोलतांना व्यक्त केले होते. त्यामुळेच संबंधित कोयता व तलवारीची दहशत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करीत असतांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई बाबतचे वृत्त नॅशनल फोरममध्ये प्रसारित करण्यात आले होते. दरम्यान अंमली पदार्थ विभाग क्र. 1 व 2 यांच्या थेट कारवाया सुरू होत्या परंतु इतरही पोलीस स्टेशन यांनी पुढे येवून कोयता, तलवार आणि अंमली पदार्थ विरोधाची तलवार अधिक गतिमान...
आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum Daily Crime Report 11-01-2023 आजचे पोलीस स्टेशन = कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन सामाजिक सुरक्षा विभागाचा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत पुनः छापा,रात्री 10 नंतर कर्णकर्कश्य आवाजात सुरू असलेल्या रेस्टोबार वर कारवाई, पावणेदोन लाखाचा साऊंड सिस्टीम जप्त-कोरेगाव पार्क/ पुणे/ सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी ऑल आऊट मोहिमे दरम्यान कोरेगाव पार्क भागात गस्त घालत असतांना, कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 वरील पब्लिक रेस्टोबार मध्ये कर्ण कर्कश्य आवाजात साऊंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे दिसून आले. या हॉटेलवर कारवाई करून त्यांच्याकडील 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करून हॉटेल मॅनेजर विरूद्ध पर्यावरण संरक्षण कायदयाअंतर्गत ध्...
पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवर 3 हजार 765 गुन्हेगार,<br>23 जानेवारी पर्यंत पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवर 3 हजार 765 गुन्हेगार,
23 जानेवारी पर्यंत पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

पोलीस क्राइम
national forum pune गुन्हेगारांचा सर्वाधिक वावर हॉटेल, लॉज, ढाबे, रेल्वे स्टेशन, एस.टी व बस स्थानकांवर… ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासुन सुमारे 3 हजार 765 गुन्हेगारांपैकी 698 गुन्हेगारांची धरपकड पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावरून सोमवार व मंगळवार या दोन दिवशी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले असून, यामध्ये सर्व गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशनने सहभाग नोंदविला आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासुन सुमारे 3 हजार 765 गुन्हेगारांपैकी 698 गुन्हेगार मिळून आले आहेत.तसेच सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपआयुक्त विशेष शाखा यांनी दि. 23 जानेवारी 2023 ...
फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा विभागाने बंदी असलेला पंतगाचा मांजा जप्त केला, तर गुन्हे युनिट क्र. 1 यांची कोयत्यावर संक्रांत पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumकोणत्याही जाती व धर्माचा सण उत्सव असो, घर सजावटीचे सर्व साहित्य बोहरी आळीत मिळणार म्हणजे हमखास मिळणार हे पुणेकरांना पक्के ठाऊक आहे. दिवाळी,दसरा असो की, ईद, ख्रिसमस, गणपती उत्सव की डॉ. आंबेडकर जयंती… पुणेकर नागरीक महात्मा फुले मंडई, लक्ष्मी रोड वर आला नाही असे कधी होतच नाही. मंडई, लक्ष्मी रोड नंतर सर्वांचे पाय बोहरी आळीकडे वळतात असा अनुभव आहे. परंतु यंदा याच बोहरी आळीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखेची संक्रांत आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाकडून प्रतिबंधित मांजा जप्त -पुण्यातील रविवार पेठेतील बोहरी आळी येथे प्रतिबंधित मांजा साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या अनुषंगाने सामाजि...