Thursday, March 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

वाऱ्या वरती रविचंद्राचे झुंबर, सुद्ध हरपती दाही दिशा
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात… पुणे शहर पोलीस आयुक्तालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात्‌‍… जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, जागतिक दर्जाचे ससुन हॉस्पीटल आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, पुणे रेल्वे स्टेशन आहे, रूबी व जहाँगिर सारखी हॉस्पीटल्स आहेत. त्या ठिकाणी ताडीवाला रोड व इतर स्लम परिसर आहे. याच ठिकाणी अवैध जुगाराचा बाजार भरला जातोय, याच ठिकाणी राजाबहाद्दुर मिल्स आवारात यंत्रमागाची धडधड बंद होवून तिथं आता आठ पब मधुन डीस्कोचा धडाधड आवाज धडकत आहे. आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान तर होतच आहे. परंतु हातभट्टी, गांजांची देखील विक्रीचे हब निर्माण व्हावे अशी अतिशय शोकांतिका आहे.


पुणे शहरात 33 वी पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू आहे. शहरात जी- 20 ची परिषद होत आहे. सगळीकडे रंगरंगोटी सुरू आहे. परंतु बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत मात्र असाही कारभार सुरू आहे. काय सुरू आहे बंडगार्डन हद्दीत… पोलीस आयुक्तालय, बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत येतय, त्यामुळे बंडगार्डन पोलीस स्टेशनला पोलीस आयुक्तांच्या कारवाईची थोडीही भिती नाहीये काय… वस्तुस्थिती काय आहे… वाचा सोमवार दि. 16 जानेवारी 2023 नॅशनल फोरमच्या अंकात…. वाऱ्या वरती रविचंद्राचे झुंबर, सुद्ध हरपती दाही दिशा…