Monday, May 13 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Punepolice

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मुंबई पोलीस दलात कर्तव्यावार असतांना अपघाती मृत्यू झालेल्या झालेल्या पोलीसाच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी पोलीस पत्नीने सरकारकडे दाद मागितली परंतु, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पोलीस पतीला न्याय मिळावा म्हणून त्या माऊलीने मंत्रालया समोर विष प्राशन करून मायबाप शासनाचे लक्ष वेधले. परंतु उपचारादरम्यान पोलीस पत्नीचा मृत्यू झाला. महिलांचा कैवार घेणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या महिला आघाड्या किंवा महिला आयोगाने देखील याची दखल घेतली नाही. सामाजिक राजकीय संघटनांनी साधे निवेदनही दिले नाही. इतकी अस्पृश्यता इथे पाळली गेली आहे. न्यायासाठी पोलीस आणि पोलीस पत्नीला जीव गमवावा लागला. यात सरकार पर्यंत आवाज पोहोचला नाहीच. आणि राजकीय पक्ष, संघटना यांच्या सह माध्यमांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष करावे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. याच ठिका...
पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पोलीस क्राइम
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख… वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील न...
गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,<br>कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,
कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

पोलीस क्राइम
bandgardenpolicepune ज्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायाधिश असतांना देखील पोलीस स्टेशनवर नेमका कब्जा कोणी केला आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पोलीस स्टेशनवर ग्रेनेडचा हल्ला… शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे…शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आतंकवादयांनी निर्दयीपणे गोळीबार केला… इत्यादी.. इत्यादी बातम्या जम्मु व काश्मिरबाबत कुण्या ऐकेकाळात येत होत्या. आता मात्र सुसंस्कृत पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनवर गुन्हेगारांसह भांडवलदारांनी कब्जा केला आहे असे म्हटले तर आश्यर्च वाटायला नको… ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान बंडगार्डन पोलीस स्टेशनची अशी स्थिती असली तरी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या प्रकारच्या 25/30 गुन्हे शाखा कार्यरत असतांना, त्या क्राईम ब्रॅंचने देखील बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत घुसून क...
गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,<br>समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,
समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

पोलीस क्राइम
crime unite1 गाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासला, तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गॉगल सांगा आता तपास तरी कसा करायचा… नॅशनल फोरम/पुणे/दि/समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील सुमा पन्ना या नाना पेठेतील सिगारेट- बडीशेपच्या डिलरशिप असलेल्या दुकानातून मालाच्या विक्रीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जात असतांना, सरावलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीस मागून धक्का देवून, तुला गाडी निट चालवीता येत नाही का? असे म्हणुन त्यांचा रस्ता अडवून दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील रोख 47 लाख 26 हजार रुपये व एकुण 14 चेक असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. दरम्यान आरोपींनी वापरलेल्या काळ्या रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क, डोक्यावर टोपी, डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख प...
ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,<br>कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,
कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदेशातील पुणे शहरात एकमेव असलेल्या ओशो रजनिश आश्रमावर कोरेगाव पार्क पोलीसांनी बेछुट केलेल्या लाठीमारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिली आहे. ओशो रजनिश आश्रमावर विदेशी नागरीकांचा कब्जा, ओशो जमिन विक्री प्रकरण आणि त्यावरील आंदोलनामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. दरम्यान कोरेगाव पार्क हा संपूर्ण परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अधिनस्थ असतांना, आंदोलनकांवर लाठीमार करण्याची परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतली होती किंवा कसे याबाबत देखील आता विचारणा होत आहे. दरम्यान कोरेगाव पार्क परिसरात देशी विदेशी महिलांकरवी मोठ्या प्रमाणात देहव्यापाराचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेक्स टुरिझम व महिलांच्या अपव्यापाराचे केंद्र झाल्याने, ही परिस्थिती हाताळण्यात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विन...
दरोड्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक, 4 लाख 24 हजाराचा 21 किलो गांजा जप्त

दरोड्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक, 4 लाख 24 हजाराचा 21 किलो गांजा जप्त

पोलीस क्राइम
crime u02cppune पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदरोडयाच्या गुन्हयातुन नुकताच जामीनावर सुटलेला व अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय असणाऱ्या गुन्हेगाराला 4 लाख 24 हजार रुपयाच्या 21 किलो 200 ग्रॅम गांजासह केले अंमली पदार्थ विभाग क्र. 2 ने जेरबंद करून त्याच्या विरूद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थाच्या होणा-या तस्करीवर निर्बंध घालण्याकरीता आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व स्टाफ वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पुणे वानवडी येथील हुतात्मा...
सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

पोलीस क्राइम
sscellpune शिवाजीनगरात कारवाईसाठी जाणिवपूर्वक दिरंगाई कोण करीत आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी विमानतळ, हडपसर पोलीस स्टेशनसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बेकायदेशिर मटका जुगार अड्डयांवर कारवाई केली आहे. तीन पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाईत एकुण 1 लाख 88 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एकुण 36 इसमांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दळवी हॉस्पीटलसह इंडिया बुल्स कंपनीजवळील झोपडपट्टीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्डा, पत्ता क्लबवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शिवाजीनगरातील कारवाई करण्यास पोलीस विभागातील काही कर्मचारी जाणिपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत आहे. जुगार अड्डयावर छापा टाकुन 24 जणांवर...
हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

पोलीस क्राइम
Phoenix Market City, Vimannagar विमानतळ पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट 4 चा समांतर तपास… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोटासाठी चोरी करणारे अनेकांनी पाहिले आहेत. एवढच कशाला पारधी समाजासह अनेक इतर जमातीमधील इसमांनी पोटासाठी चोरी केल्याने त्यांना जीव जाईपर्यंत जबरी मारहाण केली आहे. मक्याचे कणीस, कुठ वडापाव, कुठ शेताच्या बांधावरील ऊस चोरून खाल्ला म्हणून जबर मारहाण करून जीव गेल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. परंतु स्वतःच्या चैनीकरीता हायप्रोफाईल चोरी करणारे मात्र शोधूनही सापडत नाहीत. दरम्यान विमानतळ पोलीस व गुन्हे युनिट क्र. 4 यांनी समांतर तपास करून एका हाय प्रोफाईल महिला अनु वेदप्रकाश शर्मा हीला अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, दि. 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबर जी-29. लोअर ग्राउन्ड फ्लोअर, फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकान...
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ 3 जबरी गुन्हे, 11 गुन्हेगार, एकासही अटक नाही,<br>शून्य तपासावरील एक शून्य शून्य

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ 3 जबरी गुन्हे, 11 गुन्हेगार, एकासही अटक नाही,
शून्य तपासावरील एक शून्य शून्य

पोलीस क्राइम
Yerwada police जबरी गुन्ह्यात येरवडा पोलीस स्टेशनचा शून्य तपास - येरवड्यात गांधी जयंतीलाही ड्राय डे नसतो हे विशेष… हातभट्टी-जुगार अड्डे जोमात- सर्व गुन्हे शाखा कोमात… पुणे/दि/ नॅशनल फोरम/येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ तीन जबरी गुन्हे घडले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या वृत्तात नमूद केले आहे. येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. 173, 175 व 176 असे सलग तीन जबरी गुन्हे दाखल झाले आहेत. एकुण 11 आरोपी असून त्यांना अद्याप पर्यंत अटक करण्यात आली नाही. गुन्हा रजि. क्र. 173 नुसार रितीक अगरवाल यांना येरवडा गावठाण येथे टोळक्याने जबरी मारहाण केली असून त्यांचे दुकान व जाळुन फायरिंग करण्याची धमकी दिली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात (गु.रजि.क्र. 175 ) आेंकार देसाई या फिर्यादीच्या वडीलांना शास्त्रीनगरच्या चौकात ट्रॅव्हल बसने ठोकरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या गुन...
चंदननगर पोलीसांची दमदार कारवाई, दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद

चंदननगर पोलीसांची दमदार कारवाई, दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद

पोलीस क्राइम
chandannagar police पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले गुन्हे आणि त्यांचा तपास ही एक किचकट बाब ठरत आहे. त्यातच स्थानिक पोलिसांना वेगवेगळ्या कामगिरी व बंदोबस्तावर नेमणूक केल्यानंतर, गुन्ह्याच्या तपासासाठी वेळेचे नियोजन करावे लागते. पोलीस स्टेशनकडून कामगिरी करण्यात दिरंगाई झाल्यास, इतर गुन्हे शाखांकडे त्यांचा तपास दयावा लागतो ही एक नित्याची प्रशासकीय प्रक्रिया असली तरी चंदननगर पोलीसांनी देखील हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा कसुन तपास करुन, दोन्ही प्रकरणांतील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. एका गुन्ह्यात दोन वर्षापासुन पोक्सो व बलात्काराच्या गुन्हयामध्ये ओडीसा येथे फरार असलेल्या आरोपीस बेड्या ठोकल्या असून, दुसऱ्या गुन्ह्यात चंदनाची चोरी करून फरार आरोपीस अटक करून त्याने केलेल्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात चंदननगर पोलीसांना यश आले आहे. दोन वर्षापासुन पोक्सो व बलात्काराच्या गुन्...