Saturday, February 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ 3 जबरी गुन्हे, 11 गुन्हेगार, एकासही अटक नाही,
शून्य तपासावरील एक शून्य शून्य

Yerwada police

जबरी गुन्ह्यात येरवडा पोलीस स्टेशनचा शून्य तपास – येरवड्यात गांधी जयंतीलाही ड्राय डे नसतो हे विशेष… हातभट्टी-जुगार अड्डे जोमात- सर्व गुन्हे शाखा कोमात…

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ तीन जबरी गुन्हे घडले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या वृत्तात नमूद केले आहे. येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. 173, 175 व 176 असे सलग तीन जबरी गुन्हे दाखल झाले आहेत. एकुण 11 आरोपी असून त्यांना अद्याप पर्यंत अटक करण्यात आली नाही. गुन्हा रजि. क्र. 173 नुसार रितीक अगरवाल यांना येरवडा गावठाण येथे टोळक्याने जबरी मारहाण केली असून त्यांचे दुकान व जाळुन फायरिंग करण्याची धमकी दिली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात (गु.रजि.क्र. 175 ) आेंकार देसाई या फिर्यादीच्या वडीलांना शास्त्रीनगरच्या चौकात ट्रॅव्हल बसने ठोकरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या गुन्ह्यात (गु.रजि. क्र. 176) पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनांत धरून घरातील सामानांची नासधुस करून सोन्याचे गंठण व रोख 30 हजार रुपये घेवून पळ काढला आहे. वरील तीन गुन्हे एकुण 11 आरोपींनी केले असून येरवडा पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक श्री. गुरव, श्री. शेलार तपास करीत असल्याचे नमूद केले आहे. तरी अद्याप पर्यंत आरोपींना अटक करण्यात येरवडा पोलीस स्टेशन अपयशी ठरले आहेत. यापूर्वी देखील दाखल गुन्ह्यांचा तपास शून्यावर असुन येरवडा पोलीस स्टेशनचा कारभार आता पोलीस आयुक्तांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली घेण्याची शक्यता दिसून येत आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,

पोलीसात तक्रार कराल तर दुकान जाळुन टाकीन, फायरिंग करेन –
रितीक आगरवाल वय 23 वर्ष रा. येरवडा गावठाण हे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास न्यु इंडिया मेडीकल शेजारी गौरव जनरल स्टोअर्स येरवडा येथे दुकानात असतांना, एकुण पाच ते सहा इसम हे रंग भरलेलेले फुगे त्यांच्या दुकानाचे पुढे उडवित होते. त्यांना हटकल्याचा राग मनांशी धरून संबंधित आरोपींनी गैर कायदयाची मंडळी जमवुन, रितीक आगरवाल व त्यांचा भाऊ गौरव आगरवाल यास हाताने मारहाण केली. तसेच त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आलेले त्याचे आई वडीलांनाही आरोपींनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
दरम्यान झालेल्या घटनेची तक्रार नोंदविण्यास आगरवाल आले असता, त्यांच्या दुकानाजवळ जाऊन संबंधित आरोपींनी रितीक आगरवाल यांचे वडील व काका यांना, जर तुम्ही पोलीसात तक्रार केली तर दुकान जाळून टाकीन तसेच फायरिंग करेन अशी धमकी दिली आहे. संबंधित पाच सहा इसमांवर गुन्हे दाखल केले असून गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक गुरव करीत आहेत.

किरकोळ वादाचे कारण, घराची नासधुस आणि लुटालुट-
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील गांधीनगर येरवडा येथे एकुण चार इसमांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून, सुनिता बनसोडे वय 35 यांनी फिर्याद दिली आहे की, गांधीनगर येरवडा येथील सुनिता बनसोडे यांच्या घरात फिर्यादी यांचा मुलगा लंकेश याच्यासोबत असणाऱ्या पूर्वी झालेल्या किरकोळ वादाचे कारणावरून फिर्यादी याचे राहत्या घरी येऊन त्यांच्या घरातील टीव्ही, टिव्हीचा सेटटॉप बॉक्स, होम थिएटर, स्टीलीची भांडी, इत्यादी सामानाची विटा व दगडाने फोडून ठेचून त्यांचे नुकसान केले आहे. तसेच सुनिता बनसोडे यांच्या घरातील सिमेंटच कपाटावर ठेवलेल्या स्टीलच्या डब्ब्यामध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण व रोख 30 हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेवून गेले आहेत.
चार इसमांविरूद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.

शास्त्रीनगरच्या भर चौकात ट्रॅव्हल्सची दादागिरी, वृद्धास ठोकरले-
शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्या भर चौकात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धास ट्रॅव्हल बसने ठोकरून त्यांच्या मृत्युस कारणीभुत ठरले आहे. ओंकार देसाई वय 27, रा. सॅलेसबरीपार्क यांनी फिर्याद दिली आहे की, देसाई यांचे वडील राजेंद्र जगन्नाथ देसाई वय 60 वर्ष मोटार सायकलवरून अहमदनगर पुणे रोडने शास्त्रीनगर चौकाच्या दिशेने जात असतांना, त्यांच्या पाठीमागुन आलेल्या ट्रॅव्हल बसवरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात चालवुन राजेंद्र देसाई यांचे मोटार सायकलच्या डाव्या बाजुने धडक देवून त्यांना खाली पाडले. खाली पडल्यानंतर, बसचे चाक त्यांच्या डोक्यावर घालुन त्यांना गंभिर जखमी केले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल बसवरील चालकाला अद्याप अटक केली नसून संबंधित आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव करीत आहेत.

जबरी गुन्ह्यात येरवडा पोलीस स्टेशनचा शून्य तपास – येरवड्यात गांधी जयंतीलाही ड्राय डे नसतो हे विशेष म्हणावे लागेल –
येरवडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज स्वीकारले जात नाहीत तसेच तक्रार नोंदवून घेतली जात नाही अशी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची ओरड आहे. तसेच दाखल गुन्हयाचा तपास झाला आहे किंवा नाही, तसेच आरोपी पकडले आहेत किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आणली जात नाही.
मागील 20/25 वर्षांपासून येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनगर, कामराज नगर, गांधी नगर, नेताजीनगर, वडारवाडी व परिसरातील हातभट्टी दारूचे धंदे जोमात सुरू असतात. संपूर्ण येरवडा हद्दीत ड्राय डे तर कधीच नसतो. जगात कुठे दारू मिळाली नाही तरी येरवडयात हमखास मिळते असा अनेक मद्यशौकीनांचा अनुभव आहे. येरवडा साळवे बाजार सायकल दुकान मच्छीबाजारातील मटक्याचे व जुगाराचे अड्डे तर सर्वश्रृत आहेत. ते कधीच बंद नसतात. सामाजिक सुरक्षा विभाग तर कधीच कारवाई करीत नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व गुन्हे शाखा येरवड्या