Thursday, January 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecp

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

सर्व साधारण
एक पोलीस स्टेशन 2 पोलीस चौक्या, एक एस.टी.स्टँड अन्‌‍ खंडीभर मटक्याचे अड्डे -जोडीला ठेवले 3 जुगाराचे क्लबनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/जुन्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुण्या एका इसमाने बादशहा औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने, छत्रपती संभाजी नगर (जुने औरंगाबाद) जिल्ह्यात दंगल पेटली, त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. त्यात अहमदनगरसह कोल्हापुरात देखील दंगली पेटल्या. पुढे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध रणशिंग फुंकले. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले. तेंव्हा कुठे दंगली शांत झाल्या. परंतु पोलीसांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध कुठेही कारवाई केली नाही. आज पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनचे स्टेटस ठेवून लाईन बॉयच्या नावाने जुगाराचा क्लब मागील एकदीड महिन्यांपासून सुरू आहे. तरी देखील पुणे पोलीस कारवाई करीत नाहीत. ए...
गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरात लुटा-लूट, कोंढवा, शिवाजीनगर, स्वारगेट व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत लुटीच्या घटना

गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरात लुटा-लूट, कोंढवा, शिवाजीनगर, स्वारगेट व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत लुटीच्या घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कोंबिंग ऑपरेशन केले. त्यात शेकडो गुन्हेगार डिटेक्ट करण्यात आले. असे असताना देखील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी, लुटालुटीचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशन -कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एक 47 वर्षीय नागरिक रा- कोंढवा खुर्द हे कौसरबाग मज्जिद कोंढवा येथे, दोन अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून 47 वर्षीय नागरिका जवळ येऊन त्यांना आम्ही पोलीस असल्याचे सांगून, एक ओळखपत्रासारखे असणारे कार्ड फिर्यादीस दाखवून त्यांच्या सोबत अरबी भाषेत बोलून फिर्यादी यांच्याकडे 4000 डॉलर (भारतीय चलनाप्रमाणे 3 लाख 20 हजार रुपये) रोख रक्कम तपासणीसाठी मागून फसवणूक करून घेऊन गेले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आह...
अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या विजय कुंभारांची विशेष शाखेत बदली,देशी विदेशी दारूचा महापुर अजुनही थांबेना, विनायक गायकवाड दारूच्या महापुराचा बंदोबस्त करणार काय?

अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या विजय कुंभारांची विशेष शाखेत बदली,देशी विदेशी दारूचा महापुर अजुनही थांबेना, विनायक गायकवाड दारूच्या महापुराचा बंदोबस्त करणार काय?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ (वृत्तविश्लेषण)राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट या आशयाची बातमी चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्यानंतर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कात्रज भागात पाहणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांची बदली केली आहे, त्यांच्या जागी आता अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सुपर हीरो श्री. विनायक गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. श्री. कुंभार यांची बदली विशेष शाखेत करण्यात आली आहे. त्याच बरोबर बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी अनिल सातपुते यांची अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 मध्ये बदली करण्यात आली आहे. सामाजिक स...
आंतरजिल्हा सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला पर्वती पोलीसांनी केले जेरबंद, सोनसाखळी चोरांकडून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आंतरजिल्हा सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला पर्वती पोलीसांनी केले जेरबंद, सोनसाखळी चोरांकडून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस क्राइम
जळगाव, अकोला, पुणे अमरावती शहरासह पुण्यातील पर्वती, भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगचे सुमारे 30 च्या वर गुन्हे केल्याचे उघड नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या टोळीने जळगावसह अकोला, अमरावती व पुणे शहरातील भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगचे सुमारे 30 च्या वर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पर्वती पोलीसांच्या तपास पथकाने ही कारवाई करून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ई-लर्निंग चौक पर्वती दर्शन पुणे येथून रिक्षातुन जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चैन स्नॅचिंग करून दुचाकीवरील दोघे चोरटे पसार झाले. त्याबाबत पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं 246/2023 भा.द.वि. कलम 392, ...
दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्व व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान या गुन्हेगारी टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी कायदयासह एमपीडीए व तडीपारीचे शस्त्र पुणे पोलीसांकडून उगारण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णि यांनी काल खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शेडगे टोळीवर 54 वी कारवाई केली तर आज शिवाजीनगरात यल्ल्या कोळानट्टी टोळीविरूद्ध 55 वी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व पुणेकर नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुणे शहरातून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठ...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला दुरध्वनी तरी कारवाई होत नाही, खरे कारण आज समजलेआज 22 व 23 ऑगस्टच्या मटका जुगाराच्या चिठ्ठया सादर करीत आहे… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी संघटीत गुन्हेगारी कार्यरत आहे, तसेच वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्या गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केले जात आहे. परंतु गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करीत असतांना, मात्र त्याच गुन्हेगारी टोळ्यांनी खडकी, विश्रांतवाडी नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वतःचे आर्थिक हिताकरीता अवैध मार्गाने जुगार अड्डे सुरू केले आहेत, त्याबाबत वारंवार पोली...
राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजचा घाट म्हटलं की राजकारणातील सापशिडीचा खेळ समोर येतो. कात्रजचा घाट म्हटलं की, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या दगा फटक्याची तीव्र आठवण होते. कात्रजचा घाट म्हटलं की भंबेरी कशी उडते याचे अनुभव व आठवणी डोळ्यासमोर तर्रर्रपणे उभे राहतात. परंतु त्याच कात्रजच्या घाटाचा हिस्का जर शासनातील सरकारीबाबु लावत असतील तर जाब विचारायचा तरी कुणाला. सर्पउद्यानापासून ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि तिथून पुढे कात्रजच्या बोगद्यापर्यंत आणि व्हाया मांगडेवाडी,जांभूळवाडी, नऱ्हे यासारख्या एकूण 40 ते 45 हॉटेल कम ढाबा मध्ये दिवस रात्र बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री केले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यातून राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे तसेच पुणे शहर पोलीसातील स्थान...
बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल क्राईम आणि महाराष्ट्र क्राईम रेकॉर्डनुसार देशात व राज्यात गुन्हेगारी वाढली असल्याचे आकडेवारीनिशी प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान गुन्हेगारीमध्ये वाढ का होत आहे याबाबत पुणे शहर पोलीसांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. गुन्हेगारीतूनच अवैध धंदे व खाजगी सावकारी, कंपनी सावकारी अधिक वाढली लागली आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात बऱ्यापैकी वास्तवातील गुन्हेगारीचे चित्रण करण्यात आले आहे. थोडक्यात आर्थिक फायदयाकरीता गुन्हेगारी वाढली आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. आता त्यामध्ये पोलीसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायचे सोडून पो...
पाजा, पाजा… आंबेडकरी बहुजन समाजाला गावठी हातभट्टी पाजा,कष्टकरी, वंचित, पीडित बहुजन समाजाच्या तिसऱ्या पिढीला देखील देशी दारू आणि गावठी हातभट्टीपासून ठार करा, मारा, उध्वस्त करा,

पाजा, पाजा… आंबेडकरी बहुजन समाजाला गावठी हातभट्टी पाजा,कष्टकरी, वंचित, पीडित बहुजन समाजाच्या तिसऱ्या पिढीला देखील देशी दारू आणि गावठी हातभट्टीपासून ठार करा, मारा, उध्वस्त करा,

पोलीस क्राइम
वाडी ते बिबवेवाडी व्हाया 32 परगणा…बेकायदा धंदेवाल्यांना खूप पैसा कमवायचा आहे, पोलिसांना हप्ता घ्यायचाय, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पक्षांचे नेते पुढारी आणि तथाकथित पत्रकारांना ब्लॅकमेलचा धंदा करून खंडणी उकळायची आहे, चौघेही मिळून आंबेडकरी बहुजन समाजाची तिरडी उचलत आहेत नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तातील सामाजिक सुरक्षा गुन्हे विभाग यांनी लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करून सुमारे 8लाख 28 हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन व विमानतळ पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन ही दोन पोलीस स्टेशन नाममात्र आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त...