Thursday, December 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरात लुटा-लूट, कोंढवा, शिवाजीनगर, स्वारगेट व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत लुटीच्या घटना

नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कोंबिंग ऑपरेशन केले. त्यात शेकडो गुन्हेगार डिटेक्ट करण्यात आले. असे असताना देखील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी, लुटालुटीचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशन –
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एक 47 वर्षीय नागरिक रा- कोंढवा खुर्द हे कौसरबाग मज्जिद कोंढवा येथे, दोन अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून 47 वर्षीय नागरिका जवळ येऊन त्यांना आम्ही पोलीस असल्याचे सांगून, एक ओळखपत्रासारखे असणारे कार्ड फिर्यादीस दाखवून त्यांच्या सोबत अरबी भाषेत बोलून फिर्यादी यांच्याकडे 4000 डॉलर (भारतीय चलनाप्रमाणे 3 लाख 20 हजार रुपये) रोख रक्कम तपासणीसाठी मागून फसवणूक करून घेऊन गेले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन-
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महानगरपालिकेच्या ब्रिजवरील बस स्टॉप वर लुटीचा प्रकार घडला आहे. एक 45 वर्षीय महिला मनपा भवन येथील ब्रिजवरील बस स्टॉप येथे त्यांच्या राहत्या घरी जाण्यासाठी मनपा भवन ते धनकवडी बस स्टॉप वर येऊन बसमध्ये चढत असताना. त्यादरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसमधील गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या डाव्या हातातील सोन्याची पाटली, रुपये तीस हजार किमतीची चोरी करून नेली आहे, अधिक तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे करीत आहेत.

स्वारगेट पोलीस स्टेशन-
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील स्वारगेट एसटी स्टँड येथे एक 42 वर्षीय महिला रा. घाटाव ता. रोहा, जिल्हा रायगड या स्वारगेट एसटी स्टँड येथून बार्शी येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या हँडबॅग मध्ये असलेल्या पर्स मधील 35 हजार रोख रक्कम व सोन्याचे चैन असा एकूण 95 हजार रुपये किमतीचा ऐवज पर्ससह चोरी करून नेला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अष्टेकर करीत आहेत.

लष्कर पोलीस स्टेशन-
लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील एक 53 वर्षीय महिला रा. एन आय बी एम रोड कोंढवा या रीच गर्ल एलिमेंट शॉप नंबर 73 ग्राउंड फ्लोअर फ्लॉवर सेंटर कॅम्प पुणे येथे त्यांचे कपड्याचे दुकान असून दोन अनोळखी महिलांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने येऊन त्यांचे लक्ष विचलित करून, दुकानातील काउंटर वरचे टेबलाखाली ठेवलेले ग्रे कलर ची पर्स त्यामधील 2 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख 70 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज पर्स सह चोरी करून नेला आहे. लष्कर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक महिंद्र कांबळे अधिक तपास करीत आहेत.