Saturday, March 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: national forum

दलित-आदिवासींवर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेनेचा दरोडा, घटनात्मक तरतुदी असलेले 30 हजार कोटी रुपये संगनमताने पळविले,

दलित-आदिवासींवर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेनेचा दरोडा, घटनात्मक तरतुदी असलेले 30 हजार कोटी रुपये संगनमताने पळविले,

सर्व साधारण
sc-st अनु. जाती/ जमातींचा बजेटचा स्वतंत्र कायदा करा पुणे/दि/ नॅशनल फोरम/ राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी, दलित व आदिवासी अर्थात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या घटनात्मक बजेट तरतुदींवर दरोडा घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे मागील 20 वर्षात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेना व महाविकास आघाडी असलेल्या काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना यांनी सुमारे 30 हजार कोटी रुपयांवर दरोडा टाकल्याची माहिती राज्याचे माजी सनदी अधिकारी श्री. इ.झेड खोब्रागडे यांनी दिली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, राज्याचा अर्थसंकल्प 5 ध्येयावर आधारित आहे, सर्व समावेशक आहे हे पहिल्यांदा सांगितले नाही यापूर्वी सुद्धा बजेट भाषणात हेच सांगितले होते. मग बजेट तरतुदींचे काय झाले? खर्च किती आणि कशावर झाला हे सरकारने सांगावे? गेल्या 20 वर्षात सामाजिक न्यायाला प्रत्यक्ष कि...
हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

पोलीस क्राइम
Phoenix Market City, Vimannagar विमानतळ पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट 4 चा समांतर तपास… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोटासाठी चोरी करणारे अनेकांनी पाहिले आहेत. एवढच कशाला पारधी समाजासह अनेक इतर जमातीमधील इसमांनी पोटासाठी चोरी केल्याने त्यांना जीव जाईपर्यंत जबरी मारहाण केली आहे. मक्याचे कणीस, कुठ वडापाव, कुठ शेताच्या बांधावरील ऊस चोरून खाल्ला म्हणून जबर मारहाण करून जीव गेल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. परंतु स्वतःच्या चैनीकरीता हायप्रोफाईल चोरी करणारे मात्र शोधूनही सापडत नाहीत. दरम्यान विमानतळ पोलीस व गुन्हे युनिट क्र. 4 यांनी समांतर तपास करून एका हाय प्रोफाईल महिला अनु वेदप्रकाश शर्मा हीला अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, दि. 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबर जी-29. लोअर ग्राउन्ड फ्लोअर, फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकाना...
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ 3 जबरी गुन्हे, 11 गुन्हेगार, एकासही अटक नाही,<br>शून्य तपासावरील एक शून्य शून्य

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ 3 जबरी गुन्हे, 11 गुन्हेगार, एकासही अटक नाही,
शून्य तपासावरील एक शून्य शून्य

पोलीस क्राइम
Yerwada police जबरी गुन्ह्यात येरवडा पोलीस स्टेशनचा शून्य तपास - येरवड्यात गांधी जयंतीलाही ड्राय डे नसतो हे विशेष… हातभट्टी-जुगार अड्डे जोमात- सर्व गुन्हे शाखा कोमात… पुणे/दि/ नॅशनल फोरम/येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ तीन जबरी गुन्हे घडले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या वृत्तात नमूद केले आहे. येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. 173, 175 व 176 असे सलग तीन जबरी गुन्हे दाखल झाले आहेत. एकुण 11 आरोपी असून त्यांना अद्याप पर्यंत अटक करण्यात आली नाही. गुन्हा रजि. क्र. 173 नुसार रितीक अगरवाल यांना येरवडा गावठाण येथे टोळक्याने जबरी मारहाण केली असून त्यांचे दुकान व जाळुन फायरिंग करण्याची धमकी दिली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात (गु.रजि.क्र. 175 ) आेंकार देसाई या फिर्यादीच्या वडीलांना शास्त्रीनगरच्या चौकात ट्रॅव्हल बसने ठोकरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या गुन्...
पुणे पोलीसांकडून गुन्हेगारी कृत्यांसह हत्यारांचे नामांतर? नामांतर करून गुन्हेगारी कमी झाली असल्याचा बनाव…

पुणे पोलीसांकडून गुन्हेगारी कृत्यांसह हत्यारांचे नामांतर? नामांतर करून गुन्हेगारी कमी झाली असल्याचा बनाव…

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/कोयता गँगचा मुद्दा राज्य विधीमंडळात गाजल्यानंतर देखील संपूर्ण पुणे शहरात कोयता गँगचा उच्छाद वाढला होता. त्यामुळे पुणे पोलीसांनी सध्या नवीच शक्कल लढविली असल्याचे समोर आले आहे. थेटच हत्यांरांची नावे बदलण्यात आली असून त्यांचे नामांतर करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्याच्या हकीकतामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. तलवार, चाकु, पालघन, कोयता यांना आता एक लोखंडी हत्यार असे नामांतर करण्यात आले आहे तर मंगळसुत्र, सोनसाखळी चोरीबाबत आता गुन्ह्याच्या विवरणामध्ये बदल करून, एक वस्तु जबरी चोरी करून नेली आहे अशा प्रकारच्या नोंदी करून वृत्तपत्रांना प्रेस नोट सादर केली जात आहे. त्यामुळे पुणे पोलीसांनी गुन्हेगारी कृत्यांसह हत्यारांचे नामांतर केले आहे की काय अशी सध्या चर्चा आहे. पुणे शहर पोलीस दलाचा पदभार नुतन पोलीस आयुक्तांनी घेतल्यानंतर, गुन्हेगारांची झाडाझडती सुरू झाली. पुणे शहरातील रेकॉर्डव...
पुणे महापालिकेचे ॲडव्होकेट पॅनल निवडीची नौटंकी,<br>वकील पॅनल निवड प्रक्रियेद्वारा निशा चव्हाण यांच्याकडून पुणे महानगरपालिका व वकिलांची फसवणूक

पुणे महापालिकेचे ॲडव्होकेट पॅनल निवडीची नौटंकी,
वकील पॅनल निवड प्रक्रियेद्वारा निशा चव्हाण यांच्याकडून पुणे महानगरपालिका व वकिलांची फसवणूक

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मोबाईल टॉवरची 10 हजार कोटी रुपये मालमत्तेची वसुली, पर्वती येथील एक हजार कोटी रुपयांची जमीन, गुलटेकडी येथील 100 कोटी रुपये किमतीची जमीन यासह मिळकत कर विभागाची सुमारे दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे दावे प्रलंबित असून टीडीआर, एफएसआय अभिप्राय बाबतची प्रकरणे, ॲडव्होकेट पॅनल यासह पुणे महानगरपालिकेच्या मुख्य विधी अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर सुमारे 100 दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाचा एक प्रमुखभाग ॲडव्होकेट पॅनलच्या नियुक्तीचा होता. फेबु्रवारी 2023 रोजी ॲडव्होकेट पॅनलची जाहीरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. नवीन ॲडव्होकेट पॅनलच्या नियुक्तीच्या नाटकाचा प्रारंभ झाला असून, यामध्ये काही विशिष्ठ वकीलांची निवड होण्याच्या दृष्टीकोनातून जाहीरातीमध्ये अटी व शर्तींचा अंतर्भाव कर...
शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

पोलीस क्राइम
shivajinagarpolice पोलीस आयुक्त कार्यालयातील गैरमहसुली अंमलदारांमुळे खात्याची बदनामी? पुणे/दि/ नॅशनल फोरम/केंद्र व राज्य शासनाची व्हीआयपी व महत्त्वाची कार्यालय असलेल्या तसेच शिमला ऑफिस ते राजभवन पर्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या शिवाजीनगर हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास पोलीस घाबरत आहेत का असा सवाल पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक विचारू लागले आहेत. दळवी हॉस्पीटल, हॉस्पीटलचा रस्ता, तेथील गाड्या, भोसले जलतरण तलाव, गार्डन, गॅरेज, जिथं तिथं जुगाराच्या चिठ्ठया लिहणारे ठायी ठायी बसले आहेत. लोकांची गर्दी होत आहे. सगळीकडे गुटखा खाऊन पचापच थुंकून घाण केली जात आहे. असे सर्वत्र चित्र असतांना पोलीस मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. भारतीच्या विजय कुंभारांचे महान तत्वज्ज्ञान आणि गैरकायदयाचे कृत्य -...
पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पोलीस क्राइम
पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई…12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका.. तरीही… मध्यरात्रीच्या 6 तासात पुनः 521 गुन्हेगार मिळून आले… पुणे शहरात गुन्हेगारांची संख्या नेमकी किती आहे.. गुन्हेगारी टोळ्या किती कार्यरत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये प्रत्येकी किती गुन्हेगार आहेत…पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन गुन्हेगार चेकींग गुन्हेगार आदान - प्रदान दत्तक गुन्हेगारया योजना राबवुन 1. गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करणे 2. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, 3. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे अशी सर्व उपाय योजना केली तरी प्रत्येक चेकींग वेळी गुन्हेगारांची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/50 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात एकुण किती गुन्हेगार आहेत… किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत…...
पुण्यात खाजगी सावकारांचा उच्छाद

पुण्यात खाजगी सावकारांचा उच्छाद

पोलीस क्राइम
30 हजाराच्या कर्जावर 73 हजाराचे मुद्दल व्याज, तर 45 हजार रुपयांच्या कर्जावर 1 लाख 9 हजार रुपयांची पठाणी वसुली,पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँगचा उच्छाद… कोयता गँग रस्त्यावर उतरली.. पोलीसांसहित सर्व मिडीया कोयता .. कोयता म्हणून ओरडत असतांना, आम्हीच प्रथम कोयता गँगचा बोलविता धनी खाजगी सावकार असून, त्यांच्या जो पर्यंत मुसक्या आवळल्या जात नाहीत, तो पर्यंत कोयता माफीया शांत बसणार नाही. शेवटी माथाडी आणि खाजगी सावकारांचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला आहे. फायनांशिअल कंपन्यांची वसुली करणारे देखील कोयतामाफीयाच असून, त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विश्रामबाग पोलीसांनी एका खाजगी सावकारावर गुन्हा दाखल केला असून त्याच्या पठाणी वसुलीची हकीकत खालील प्रमाणे आहे. कोंढवे धावडे येथे राहणाऱ्या एका 28 वर्षीय इसमाने आरोपी कैलास कडू वय 354 रा. हिंगणे खुर्द याच्...
विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा ,<br>पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट

विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा ,
पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा मधील 12 ए चे पुरस्कर्ते आता भारती विद्यापीठात.. तर विशेष शाखेच्या भरत जाधवांना सामाजिक सुरक्षेची जबाबदारी… बंडगार्डनचे मानकर खंडणी विरोधी पथकातहुश्यऽऽ… अखेर विश्रामबागला सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाले… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट करण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यात बदलुन आलेल्या पोलीस निरीक्षकांना या बदल्यांत पदस्थापना देण्यात आली आहे. या शिवाय पोलीस आयुक्तालयातील तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. 3 सहाय्यक पोलीस आयुक्त व 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग या पदाला पुर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. तर राजेश पुराणिक यांच्यानंतर, सामाजिक सुरक्षा विभागाचा भार पेलणारे व 12 ए चे पुरस्कर्ते विजय कुंभार यांची ...
पुणे पोलीसांवर हल्ला करण्याची सुपारी कुणी दिली ?

पुणे पोलीसांवर हल्ला करण्याची सुपारी कुणी दिली ?

पोलीस क्राइम
pune police attack पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेळेस पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतही तीन/चार पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. पाच सहा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीसांवर हल्ले झाले आहेत. या हल्यामागे नेमके कोण आहे.विमानतळ पोलीस स्टेशन मधील पोलीस अंमलदार श्री. सचिन जगदाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली आहे. त्यात कारण तर काय, श्री. जगदाळे हे नियंत्रण कक्षाकडून फोन आल्यामुळे चायनिज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. परंतु आरोपी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले वय- 24 रा. जिल्हा उस्मानाबाद याला जेवायला मिळाले नाही म्हणून त्याने पोलीसांवर चाकुने हल्ला केला अशी सर्वत्र बातमी प्रसारित झाली आहे. भले… भले… नागरीक आणि गुन्हेगारही पोलीसांपासून चार हात दूर राहतात. त्यात उस्मानाबाद म्हटल्यानंतर तर … पाहुणा ...