Wednesday, May 8 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: National Forum Crime News

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

सर्व साधारण
एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले...
विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

पोलीस क्राइम
विमानतळ पोलीसांकडून महाराष्ट्र शासन व पुणे शहर पोलीसांची बदनामी केली जात आहे काय…? चार पोलीस स्टेशनने हाकलुन लावलेल्या दरोडेखोरास विमानतळ पोलीसांनी हद्दीत प्रवेश का दिला? दोन/तीन महिने हद्दीत दरोडा घालणारा अब्दुल…अचानक अज्ञात इसम झाला तरी कसा ? ह्याच्यावर मोक्का, त्याच्यावर मोक्का, ह्याच्यावर एमपीडीए, त्याच्यावर एमपीडीए, हा तडीपार तो तडीपार.. आणि सराईत गुन्हेगार पुणे पोलीसांच्या डोईवर? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यामध्ये सुमारे 30 ते 35 वर्ष मटका, जुगारअड्डे चालविणाऱ्या जुगारखोर इसमाने, देवांना देखील सोडले नाही. थेटच वाई येथील मांढरदेवीच्या यात्रेत भोळ्या भाविकांना दुप्पट पैशांचे आमिष दाखवुन, लुटणारा अब्दुल याने जत्रा संपल्यानंतर, चार पोलीस स्टेशनचे दरवाजे ठोठावले. परंतु ही दरोडेखोरी आमच्या हद्दीत नको म्हणून त्याला पिटाळुन लावले. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन यांनी मा...
फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आम्ही इथले भाई आहोत, आता एक एकेला मारून टाकु म्हणत हवेत तलवारी आणि लोखंडी हत्यार फिरविणाऱ्या भाई आणि भाईच्या नम्रकारींना पुणे पोलीसांची चांगलीच पेकाटात लाथ घातली आहे. कालपर्यंत शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात मोक्का कायदयाने शंभरी गाठत आणली आहे. काल फराखान्यात ऐक्क्यांशी तर सहकारनगरात 82 वी मोक्काची कारवाई झाली आहे. आता तरी भाईगिरीचा नाद करून पुणे पोलीसांना आव्हान देणाऱ्या व कायदया व सुव्यस्थेचे तीन तेरा करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविली असल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून येत आहे. भाईगिरीचा छंद बाळगणाऱ्यांनी लक्षात ठेवल पाहिजे - गुन्हेगारीचा एकदा शिक्का लागला की पुढील 30 वर्ष पोलीस रेकॉर्डला नाव राहते असे सांगितले जाते. कुठेही सरकारी तर सोडाच परंतु खाजगी नोकरीही मिळणार नाही. चारित्र्य पडताळणीत गुन्हेगार म्हणूनच उल्लेख होणार कुणीही काम...
खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 व खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नजीर सलीम शेख वय 29 रा. काशेवाडी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणूकीत काहीएक फरक पडत नव्हता. तसेच तो अत्यंत कु्रर, खुनशी व भांडखोर असल्याने तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करून गुन्हे करीत होता. व्यापाऱ्यांना व बिल्डरांना खंडणी मागणे, नागरीकांना त्रास देवून त्याचे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने अखेर खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने याबाबत अहवाल पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांचेपुढे सादर करून सराईत गुन्हेगाला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायदयानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. खडक पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य -खडक पोलीस स्टेशन पुणे या गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख, व...
गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यात भारतीच्या पोलीसांना अपयश, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा राडा, तुला खल्लासच करणार म्हणत डोक्यावर घातक हत्यारांनी वार केले

गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यात भारतीच्या पोलीसांना अपयश, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा राडा, तुला खल्लासच करणार म्हणत डोक्यावर घातक हत्यारांनी वार केले

पोलीस क्राइम
भारती मधील गांजा आणि हुक्क्याचा धुर, वेश्याव्यसायावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तो पर्यंत राडा थांबण्याचे नाव घेत नाहीयेनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश सुपर मार्केट चालकास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आली. तथापी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गुन्हेगारांनी राडा घातला आहे. गुन्हेगारी टोळ्यांनी हत्यारानिशी सज्ज होवून तसेच बेकायदेशिर जमाव जमवुन, फिर्यादीस शिवीगाळ करून, तु आता गेलास, तुला खल्लासच करणार असे म्हणून त्याच्या डोक्यावर घातक शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजा व खिडक्यांवर लाथा व दगड मारून, पार्क करून ठेवलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत किती पराकोटीची गुन्हेगारी वाढली आहे, हे दिसून येत आहे. याला प्रामुख्याने भारती विद्यापीठ प...
आनंदाची बातमीः शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

आनंदाची बातमीः शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

पोलीस क्राइम
आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीजनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल मागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डे चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) प्रमाणे कारवाई करून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवल्याची माहिती विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. वसंत कुवर यांनी नॅशनल फोरम यांना लेखी पत्राव्दारे कळविले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल पाठीमागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डा व क्लब सुरू असल्याची बातमी ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये नॅशनल फोरम मध्ये प्रसारित केली होती. बातमीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर व सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांना अवगत करण्यात आले होते. त्याच...
पुणे शहरात ड्रग माफियांवर धडाधड कारवाई करणाऱ्या विनायक गायकवाडांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील हुक्का पार्लर, गांजाचा धुर, जुगाराचे अड्डे आणि वेश्याव्यवसायवर नियंत्रणही ठेवता येईना?

पुणे शहरात ड्रग माफियांवर धडाधड कारवाई करणाऱ्या विनायक गायकवाडांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील हुक्का पार्लर, गांजाचा धुर, जुगाराचे अड्डे आणि वेश्याव्यवसायवर नियंत्रणही ठेवता येईना?

पोलीस क्राइम
क्राईम युनिट मधील बदली नंतर, पोलीस अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपुष्टात येते काय….नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गांजा आणि अंमली पदार्थांच्या धुराचे लोट उठत आहेत. स्थानिक नागरीकांनी शेकडोंनी तक्रारी केल्या तरी मसाज पार्लरच्या माध्यमातून सुरू असलेला वेश्याव्यवसाय बंद केला जात नाहीये. त्यातच मटका अड्डे, ऑनलाईन लॉटरी जुगारासह हातभट्टी व देशी विदेशी दारूने संपूर्ण भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला विळखा घातला आहे. असे असतांना देखील सध्या कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांना नियंत्रण आणता आलेले नाही. त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी स्थानिक मंडळ पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यानी त्यांची भेट घेवून हद्दीतील अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय व हातभट्टीवर दारूवर कठोर कारवाईची मागणी केली होती. परंतु आजही त्यावर कारवाई होत नसल्याने ...
बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपासून स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांबाबत जनजागृतीला सुरूवात केली. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत अंडरवर्ल्डचे नाव घेवून व लाईन बॉयच्या सुरात स्वारगेट पोलीस स्टेशन लगत जुगाराचा क्लब सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. आज 13 तारीख आहे. तरी देखील जुगाराचा क्लब अजुनही बंद झालेला नाही. त्यामुळे 18/22 तास चालणारा जुगाराचा क्लब नेमका कुणाचा आहे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन लगत असलेला क्लब -डॉनचा की लाईन बॉयचा -स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेला जुगाराचा क्लब हा सुमारे 18 ते 22 तास सुरू असतो. गणेशोत्सवाच्या काळात तर जुगाऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन लगत सुरू असलेला ज...
दरबारी नाव सिंहगड पोलीस स्टेशन, कारभार मात्र निजामशाही- आदिलशाहीसारखा… कॅसिनोला राज्यात बंदी, तरीही सिंहगड हद्दीत मात्र विभागुन कॅसिनो चालविला जातो…

दरबारी नाव सिंहगड पोलीस स्टेशन, कारभार मात्र निजामशाही- आदिलशाहीसारखा… कॅसिनोला राज्यात बंदी, तरीही सिंहगड हद्दीत मात्र विभागुन कॅसिनो चालविला जातो…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर व त्यांच्याही काळात अर्ध्या महाराष्ट्रावर आदिलशाही व निजामशाहीचा कारभार सुरू होता. पुणे, सुपे व बारामती हे तर विजापुरच्या आदिलशाहीचा महसुली परगणा होता. ब्रिटीश भारत व स्वतंत्र भारतात आदिलशाही, निजामशाही संपुष्टात आली तरीही मनांमधील आदिलशाही आणि निजामशाहीचा कारभार अजुन निघालेला नसल्याचे दिसून येत आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीचा कारभार देखील विजापुरच्या आदिलशाहीला साजेसा असाच असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कॅसिनोला बंदी आणलेली आहे. असे असतांना, एका कॅसिनो मध्ये गैरकायदयाच्या ज्या ज्या बाबी असतात त्या त्या सर्व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत जागोजाग दिसून येतात. कॅसिनो मध्ये असलेले वेगवेगळे विभाग, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात सिंहगड रोड पोलीस स्टेशन...
पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीसांकडून गुन्हेगारीचे उदात्तिकरण सुरू आहे काय, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, गुन्हेगारीला जात किंवा धर्म नसतो, परंतु पकडण्यात आलेले, तडीपार केलेले, मोक्का व एमपीडीए सर्वाधिक संख्येने लावलेले आरोपी गुन्हेगार हे दलित, आदिवासींसह ओबीसी समाजाचेच कसे… त्यातल्या त्यात अनु.जातीतील बौद्ध, मातंग व पारधी समाजाची संख्या अधिक कशी होत आहे, असे प्रश्न घेवून 2 ऑक्टोंबर ( म. गांधी जयंतीपासून) अभियान सुरू केले आहे. तसेच इजी अर्थात सहज पैसे मिळणारे अवैध व बेकायदेशिर धंदयाबाबत उघडपणे आवाज उठविल्यानंतर, त्यात स्वारगेट, पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांची बाजू मांडण्यात आली आहे. तथापी मागील 10 दिवसात दोन्ही पोलीस स्टेशन मधील एकाही मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, खाजगी सावकारी, देहव्यापार, बिल्डर लॉबीसह गोल्ड म...