Thursday, July 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे आणि गुन्हेगारांचा अड्डा आहे काय…पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलीसांनी केले जेरबंद

पुणे/दि/national forum/
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड पुण्याचा नावलौकिक आहे. त्याच मार्केटयार्डात चाकू, सुऱ्या, कोयते पकडण्यात आले होते. आता त्याच मार्केटयार्डात अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे, मार्केटयार्ड म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा असे काहीसे चित्र सध्या दिसत आहे.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष यादव यांना खबर मिळाली की, मार्केटयार्डातील गोल बिल्डींग जवळ एक इसम उभा असून त्याच्याकडे अवैधरित्या पिस्तुल आहे. त्याच्या हातातून कोणतातरी गंभिर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ए.व्ही. देशपांडे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती सवित ढमढेरे यांना ही बाब सांगुन कारवाईबाबतच्या सुचना मिळाल्या. 

वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार मार्केटयार्ड पोलीसांनी मार्केटयार्डातील गाळा नं. 42 गोलबिल्डींग जवळ सापळा रचुन आरोपी सागर बबन पारीटे वय 35 वर्ष रा. लोअर इंदिरा नगर बिबवेवाडी यास ताब्यात घेतले आहे. त्याच्या अंगझडती मध्ये एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतुसे मिळून आल्याने त्याच्याविरूद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. 
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ए.व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती सविता ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि.कांबळे, पो. उप. निरी. शिंदे, पोलीस अंमलदार पराळे, दिपक मोघे, पोटे, आशिष यादव, लोणकर यांच्या पथकाने केली आहे.