पुणे शहरावर 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा दरोडा, घरफोडी आणि फसवणूक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचे पत्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वेसर्वा खासदार सुप्रिया सुळे यांना पाठविले होते. खासदार सुळे यांनी देखील पोलीस आयुक्तांच्या पत्रावर दुसरे पत्र रवाना करून पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान पुणे शहरात दररोज गावठी कट्टे, बंदूका, लोखंडी कोयते पोलीस अंमलदारांकडून जप्त केले जात आहेत. त्यात भरीस भर म्हणून घरफोडी, दरोडा, फसवणूकीच्या प्रकरणात देखील कमालिची वाढ झाली आहे. लोकसेवक व लोकप्रतिनिधींच्या वाकःयुद्धात पुणेकर मात्र भरडले जात आहेत. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था असल्यामुळे की काय पुणे शहरात पुन्हा 37 (1) (3) कलम लागु करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना पुन्हा नव्याने आरासा दाखविण्याची आवश्यकता नाही हेच खरे. मागील दोन दिवस...
