Friday, November 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Congress-Nationalist Congress

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व 48 जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य ॲड. आंबेडकर यांनी केलं आहे. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, मी या अगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाल...
‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/इंडीया आघाडीची बहुचर्चित बैठक मुंबईत पार पडली. भाजप विरोधात एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रणच दिलेले नाहीत. वंचित सोबत नसेल तर महाराष्ट्रात इंडीया आघाडीचे भविष्य काय असेल? आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या बैठकीमध्ये 2024 ला भाजपला घेरण्याचे मनसुभे आखले गेले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने महाराष्ट्रातील राजकारणात प्रबळ असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रणच दिले नसल्याची बाब वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्पष्ट केलीय. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचितचा झंझावात निर्माण झाला होता. युतीची बोलणी फिस्कटल्याने वंचितने एम आय एम सोबत निवडणुका लढवल्या होत...
वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारताच्या निवडणूक इतिहासातील 2024 ची लोकसभा निवडणूक अगदी वेगळी असणार आहे, अगदी घनघोर राजकीय युद्धच असेल. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडीच्या दृष्टीनेही उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्र महत्त्वाचे ठरणार आहे. देशात राजकीय परिवर्तन घडवून आणायचे असेल तर विरोधकांना, विशेतः काँग्रेसला महाराष्ट्र सर करावा लागेल. मात्र त्यासाठी केवळ राजकीय आघाडी करून चालणार नाही. राज्यात निवडणुकीवर प्रभाव टाकणारे विविध सामाजिक घटक आहेत, त्या राजकीय शक्ती आहेत. ज्यांच्या बाजूने त्या जातील त्यांचा विजय निश्चित आहे, असे आजवरचे निवडणूक निकाल सांगतात. अशांपैकी महाराष्ट्रात वंचित बहुजन समाजाची राजकीय शक्तीचा निवडणुकीवर कायम प्रभाव राहिला आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही तिची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सु...
दलित-आदिवासींवर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेनेचा दरोडा, घटनात्मक तरतुदी असलेले 30 हजार कोटी रुपये संगनमताने पळविले,

दलित-आदिवासींवर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेनेचा दरोडा, घटनात्मक तरतुदी असलेले 30 हजार कोटी रुपये संगनमताने पळविले,

सर्व साधारण
sc-st अनु. जाती/ जमातींचा बजेटचा स्वतंत्र कायदा करा पुणे/दि/ नॅशनल फोरम/ राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी, दलित व आदिवासी अर्थात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या घटनात्मक बजेट तरतुदींवर दरोडा घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे मागील 20 वर्षात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-सेना व महाविकास आघाडी असलेल्या काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना यांनी सुमारे 30 हजार कोटी रुपयांवर दरोडा टाकल्याची माहिती राज्याचे माजी सनदी अधिकारी श्री. इ.झेड खोब्रागडे यांनी दिली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, राज्याचा अर्थसंकल्प 5 ध्येयावर आधारित आहे, सर्व समावेशक आहे हे पहिल्यांदा सांगितले नाही यापूर्वी सुद्धा बजेट भाषणात हेच सांगितले होते. मग बजेट तरतुदींचे काय झाले? खर्च किती आणि कशावर झाला हे सरकारने सांगावे? गेल्या 20 वर्षात सामाजिक न्यायाला प्रत्यक्ष क...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

राजकीय
काँग्रेसची अवस्था आजही जुन्या जमिनदारासारखी आहे पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसनेच अधिक काळ देशात व महाराष्ट्रात सत्ता उपभोगली आहे. देशातील व राज्यातील बहुजन समाजाला सत्तेत येऊ दिले नाही. यांनीच राज्य केलं. त्यामुळेच राज्यात 3/4 वेळेस काँग्रेसला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता देखील बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आंबेडकरी समुह व बहुजन समाजाची या पक्षांना मते हवीत परंतु या समाजांना सत्तेत वाटा दयायचा नाहीये. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गळयात आणि गाडीवर निळे झेंडे लावुन फिरत आहेत. दोन्ही काँग्रेसवाले कुणाला विचारून निळे झेंडे वापरत आहेत असा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ...