मोटरसायकल चोरास फरासखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, फरासखाना पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी
नॅशनल फोरम /पुणे/ दि/ प्रतिनिधी/पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतून सुमारे चार मोटरसायकल वाहनांची जबरी चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. 4 वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते, दरम्यान फरासखाना पोलिसांनी फरासखाना स्टाईलने चोरीचा छडा लावण्यात यश आले असून वाहन चोरास मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे.
गुन्हा उघडकीस आणण्यात प्रत्येक गुन्हे शाखेची व प्रत्येक पोलीस स्टेशनची वेगवेगळी स्टाईल किंवा पॅटर्न असतो. तसाच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना पोलीस स्टेशनचा वेगळाच फरासखाना पॅटर्न आहे. फरासखाना स्टाईलने अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत, त्यामुळे या हद्दीत सहसा जबरी चोऱ्या किंवा शरीर किंवा मालमत्ते विरुद्ध गुन्हे करण्यास गुन्हेगार व आरोपी तयार होत नसतात.
फरासखाना पॅटर्नची माहिती असताना देखील, फरसखाना हद्दीत सुमारे चार मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्याने खळबळ उडा...
