Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….
पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले आहे. तुम्ही माझा एक मटका जुगार अड्डा बंद केलात, तर मी आता पाच ठिकाणी धंदे करीत आहे, आता कारवाई करूनच दाखवा अशा स्वरूपाचे पोलीसांविरूद्ध आव्हानात्मक दंडेली करून, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे पाच ठिकाणी अवैध मटका जुगार अड्डे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता विश्रामबागचे सहायक पोलीस आयुक्त वसंतु कुवर कोणती भुमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबतची माहिती समजते की, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिका दळवी दवाखान्याजवळील भैय्यावाडी येथे काही गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी मटका जुगार अड्डे सुरू करून नागरीकांना ज्यादा पैशांचे आमिष दाखवुन लुटण्याचे उद्योग सुरू होते. दरम्यान याबाबतचे वृत्त नॅशनल फोरम मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, विश्रामबागचे सहायक पोलीस आयुक्त श्री. वसंत कुवर  यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आल्याचे पत्र 13 ऑक्टोंबर 2023 रोजी देण्यात आले होते. तथापी कारवाई केल्याच्या 15 दिवसात पुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार अड्डे सुरू झाले असल्याचे समजते.

थेटच सहायक पोलीस आयुक्तांना आव्हान –
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डा सुरू होता. तथापी त्याच्यावर कारवाई केल्यानंतर, पुनः त्याच ठिकाणी अवैध मटका जुगार अड्डा सुरू करण्यात आला आहे. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस मुख्यालयातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीत देखील मटका जुगार अड्डा सुरू करण्यात आला आहे. पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीन नामक इसम हा धंदा चालवित असल्याचे समोर आले आहे. तसेच भैय्यावाडीत शौकत या इसमाने पुनः धंदा सुरू करून सहायक पोलीस आयुक्तानांच आव्हान दिले आहे, वाकडेवाडीत देशी दारूच्या दुकानालगत भोसले नामक इसम जुगारअड्डा चालवित असल्याचे सांगण्यात येते. शिवाजीनगर गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला मटका जुगार अड्डा चालवित आहे. एकंदरीत, भैय्यावाडीतील एक धंदा बंद केला तर पुनः शिवाजीनगरात अर्धा डझन मटका जुगार अड्डे सुरू झाले आहेत. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी थेटच पोलीसांना आव्हान दिले असल्याचे दिसून येत आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्डे सुरू करून पोलीसांना आव्हान देणारे हे अर्बन नलक्षवादयासारखे दिसून येत आहेत. त्यामुळे सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदलीसाठी खुप पैसे खर्च झाले, म्हणून धंदे सुरू केले –
दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील एका कर्मचाऱ्याला त्याच्या गैरकृत्यामुळे बदली केली होती. पोलीस मुख्यालयात बदली केली तरीही देखील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये त्याचा राबता होता. दरम्यान सहा महिन्यानंतर पुनः त्याने बदली करवून घेतली आहे. वास्तविक पाहता, एक पोलीस स्टेशन केल्यानंतर, पुनः त्याच पोलीस स्टेशन मध्ये नियुक्ती मिळावी म्हणून काही कर्मचारी सातत्याने प्रयत्न करतात. त्यात त्याही पोलीस कर्मचाऱ्याने शिवाजीनगरात स्वतःची नियुक्ती करवुन घेतली आहे. नियुक्तीचे आदेश आल्यानंतर थेटच आता अर्ध्या डझन एवढे अवैध मटका जुगार अड्डे सुरू झाले आहेत. त्यात बदली व शिवाजीनगरात नियुक्ती मिळविण्यासाठी खुप पैसे खर्च झाले असल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या बळावर धंदे सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

वस्तुतः पुण्यात 30/35 पोलीस स्टेशन आहेत. तसेच दोन डझन गुन्हे युनिट आहेत. तसेच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये असतांना, अवघ्या सहाच महिन्यात पुनः त्याच पोलीस स्टेशन मध्ये नियुक्ती मिळविण्याचे प्रयोजन काय होते, याची माहिती घेतली असता, संबधित पोलीस कर्मचाऱ्याचे गुन्हेगाराच्या अवैध मटका जुगार अड्डयामध्ये पैशांची गुंतवणूक केली असल्यानेच त्याने पुनः शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पुनः नियुक्ती मिळविलेली असल्याचेही चर्चा आहे. पोलीस आयुक्तांनी ह्या सर्व प्रकरणांची गांभिर्याने दखल घेवून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची तातडीने बदली करण्याची मागणी होत आहे. 

रोज रात्री दारूचा सडा… आणि पोलीस स्टेशन मध्ये येऊन पडा-
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्रौ पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत हॉटेल व बार सुरू असतात. त्यामुळे दारूचे व्यसन असलेला हा कर्मचारी रात्रौ ड्युटीवर असतांना, दारूचे सेवक करीत असल्याचे सांगण्यात येते. थोडक्यात शिवाजीनगरात दारूचा सडा… आणि पोलीस स्टेशन मध्ये येवून पडा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे अवैध मटका जुगार अड्यावर कारवाईचे मोठे संकट सध्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये येवून पडले आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्या स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता टोळी वा एकट्याने गुन्हे करीत आहेत. तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही हे विशेष आहे. आता विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व शिवाजीनगर पोलीस स्टेशन अवैध मटका व जुगार अड्डयांवर कारवाई करणार आहेत काय हा देखील महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे.