Sunday, May 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: acpvishrambag

पेट्रोल पंपाचा मालक पोलिसांना मामा बनवतो तेव्हा….पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण …..मालकानेच केली दरोडा पडल्याची बतावणी….पोलीस आले धावून …..मालक गेला भांबावून…..

पेट्रोल पंपाचा मालक पोलिसांना मामा बनवतो तेव्हा….पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण …..मालकानेच केली दरोडा पडल्याची बतावणी….पोलीस आले धावून …..मालक गेला भांबावून…..

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/ दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)पोलिसांना विनाकारण फार काळ तुम्ही मामा बनवू शकत नाही. शेकडो नव्हे तर हजारो आणि लाखो सरावलेले गुन्हेगार पोलिसांच्या हाताखालून गेलेले असतात. समाज माध्यमांमध्ये एखादा व्यक्ती कितीही प्रामाणिकपणाचे ढोंग घेऊन फिरत असला, तरी त्या सोंगाड्याचे सोंग पोलीस प्रशासनाला चांगलेच ठाऊक असते. परंतु जोपर्यंत संबंधित इसम कायद्याच्या चाकोरीत येत नाही, तोपर्यंत त्याचं लबाड लांडग्यासारखं वागणं जनतेसमोर मांडता येत नाही. परंतु अशी ढोंग धतुर करणारे मानभावी मंडळी तशीही कमी नाहीत.शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 1 यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी आरोपींना 4 तासात अटक केली. आरोपी अटक केल्यानंतर जे काही समोर आलं ते सर्व आश्चर्यचकित करण्यासारखे हो...
ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

सर्व साधारण
एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले...