
पुराणिकांच्या पुण्याईवर सामाजिक सुरक्षा विभागाची वसुली दुप्पट… 12 अे च्या भीकार कारवाईचा गवगवा …
चार जुगार अड्डयांवर कारवाई, प्रत्यक्षात एकाच धंदयावर कारवाईची नोंद होते….पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणतात, गुन्हेगारांमध्ये पोलीसांची दहशत आवश्यक, पंतप्रधानही म्हणताहेत- भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका, मग घोड पेंड कुठ खातय…
पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या कालावधीत जुगार, मटका अड्डा, नाईट क्लब, हुक्का पार्लर या सारख्या बेकायदेशिर व अवैध धंदयावर जबरी कारवाई करून 10 कोटींचा मुद्देमाल, 682 आरोपींसह 51 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. 10 वर्षात ज्या पोलीस अधिकाऱ्यांना करता आले नाही ते एकट्या श्री. राजेश पुराणिक यांनी अवघ्या सहा महिन्यात करून दाखविले. संपूर्ण शहरातील अवैध व बेकायदेशिर धंदे बंद झाले होते. दरम्यान एका तथाकथित व्हिडीओ आणि प्रसारमाध्यमातील तथ्यहीन बातमीच...