पुणे महापालिकेत मनुवाद्यांचा विखारी थयथयाट, शासनाने खुल्या व मागास प्रवर्गातील पदोन्नतीची १०० टक्के पदभरतीचे आदेश…. कायदयाच्या राज्यात आजही इंदलकरी बेकायदा कृत्य
पुणे/दि/ प्रतिनिधी/मुघलांच्या जोखडातून रयतेच राज्य कुळवाडी भुषण छत्रपती शिवरायांनी मुक्त केलं. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविण्याची भाषा करणार्या सनातन्यांना चोख प्रत्त्युत्तर देत, मॉंसाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी सोनाचा नांगर याच पुण्यात प्रथम रोवला. परकीय मुघलांची राजवट नष्ट केली म्हणून सनातन्यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवरायांविरूद्ध सतत कट कारस्थाने केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. महाराज युद्धात हरावे म्हणून वाईत शतचंडी यज्ञ कुणी केला हे सर्वांना ज्ञात आहेच. अफजलखानाच्या भेटीवेळी कृष्णा भास्कर कुळकर्णी यानेच छत्रपती शिवरायांवर तलवार उगारली होती, त्याच सनातन्यांनी नंतरच्या काळात रयतेच्या राज्याचे दोन तुकडे केले आणि पुण्यात स्वतःला राजे म्हणून घोषित केले. पेशवाव्यांनी पुण्यात स्वतःची राजवट सुरू केली. शिवकाळात राजशिष्ठाचार विभागात कारकुणी काम करणार्यांनी स्वतःला राजे म्हणून घोषित करून, प...