पुणे महापालिकेतील बदल्या आणि बढत्यांत कोट्यवधीची उलाढाल,पुणेकरांना फटका अन् मागासवर्गीय अधिकार्यांना विनाकारण रट्टा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेने प्रदीर्घ कालावधीनंतर अभियांत्रिकी संवर्गातील स्थापत्य व विद्युत विभागातील अधिकार्यांना पदोन्नती आणि बदल्या केल्या आहेत. पदोन्नतीमध्ये आणि बढत्यांमध्ये कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली असून, या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तथापी गोपनियतेच्या नावाखाली सर्व प्रकरण जाणिवपूर्वक दडपले जात आहे. पुणेकरांना चांगल्या सुविधा देण्यात बदल्या आणि बढत्यामधील अर्थकारण हानीकारक ठरत असून, पुणे महापालिकेतील मागासवर्गीय अधिकार्यांना मात्र विनाकारण या अर्थचक्राचा रट्टा बसत आहे. नियमात असतांना देखील पदोन्नती दिली जात नाही. जाणिपूर्वक त्यांचा छळ करण्यात येत असल्याने सगळे अधिकारी हतबल झाले आहेत.
पुणे महापालिकेने १. अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग ३ या पदावरून शाखा अभियंता स्थापत्य वर्ग २ या पदावर तदर्थ पदोन्नती आदेश दि. १७/९/२०२१ = १ ते ८...