Sunday, January 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस क्राइम

Police Crime News in Pune

पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती, पोलिसांची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या कामगार नाक्यावर थांबलेल्या महिला देखील सुरक्षित राहिल्या नाहीत असे आज पकडल्या गेलेल्या आरोपींच्या कृत्य व गुन्ह्यावरून दिसून येत आहे. दि. 24 जून रोजी एका कामगार महिलेस काम देतो असे सांगून चार अनोळखी इसमांनी रस्त्यावरून चालणाऱ्या एका चार चाकी प्रवासी वाहनातून संबंधित महिला कामगार व इतरांना घेऊन जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे गाडीतून उतरून, डोंगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर घेऊन जाऊन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट रोख असे एकूण 76 हजार रुपयांची जबरीने चोरी केल्याचा प्रकार घडला. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून लुटणाऱ्या टोळी...
हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा येथील नागपूर चाळीत डिसेंबर 2016 मध्ये एका महिलेस कार्यक्रमांमध्ये नाचत असताना धक्का मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जसप्रीतसिंग गुरुचरणसिंग बाला व अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे रा. 611 कासेवाडी, गणेश मित्र मंडळाशेजारी यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेली होती. गुन्हा नोंद झाल्यापासून अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा सात वर्षापासून फरार होता. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पाहिजे आरोपी म्हणून त्याला घोषित केले होते. दरम्यान गुन्हे युनिट एक ने फरार आरोपीस जेरबंद केले आहे. दि. 27 जुलै 2023 रोजी युनिट 1 कडील पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार श्री. अमोल पवार व श्री. अभिनव लडकत यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा येथील गुन्ह्यात सात वर्षांपासून फरारी असलेला आरोपी अजय उर्फ ब...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलिसांची सराईत गुन्हेगारांसह, गुन्हेगारी टोळ्यांना हस्ते परहस्ते आर्थिक मदत… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. परंतु याच दहशतीचा वापर करून पुढे जाऊन मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थांची विक्री, पब, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, स्पा आदिंसारखे अवैध व बेकायदेशिर धंदे करून ह्याच गुन्हेगारी टोळ्या आर्थिक संपन्न होत आहेत. त्यात पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि अवैधपणे सुरू असलेले मटका जुगार अड्डे तातडीने बंद करण्याची सामाजिक संघटना...
उस्मानाबाद येथून पळून आलेल्या गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीसांनी केले जेरबंद

उस्मानाबाद येथून पळून आलेल्या गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोन पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करून पुण्यात पळुन आलेल्या गुन्हेगाराला पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी जेरबंद केले आहे. शिराढोन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302, 364, 324, 323, 504, 506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार वय 26 वर्ष, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद यास गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी करता त्याने उस्मानाबद येथे गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद यांचे ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्निक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 05 श्री. विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आ...
सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सर्वाधिक शांत असलेले पोलीस स्टेशन म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशनची ओळख होती. मोठ्या झोपडपट्टया असल्यातरी गुन्हेगारी किरकोळ स्वरूपाची होती. परंतु काळाच्या ओघात शांत असणारे पोलीस स्टेशन गुन्हेगारी कारवायांनी पुरते बदलुन गेले आहे. चार आत आणि 40 बाहेर अशी ख्याती सध्या सहकारनगर पोलीस स्टेशनची झाली आहे. तळजाई वसाहत, अरण्येश्वर, शंकर महाराज मठ, पद्मावती वसाहत सह सिद्धार्थ नगर दातेस्टॉप सारख्या मोठ्या झोपडपट्टया सहकारनगरकडे आहेत. परंतु लोकसंख्येची अधिक घनता असलेले धनकवडी, आंबेगाव सारख्या गावांसह पूर्वीच्या मिळकतींवर आता मोठी लोकसंख्या वाढली आहे. त्यात लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांसाठी लपण्यासाठी जागा असल्याने देखील हद्दीत गुन्हेगारी वाढली. गुन्हेगारांची आर्थिक ठिकाण देखील सहकारनगर भागात वाढली आहेत, मटका जुगार अड्डे, हातभट्टी ही मोठी ओळख निर्माण झाली आहे.वाहन...
गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर पोलीस रस्त्यावर उतरले…. वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळातून पोलीसांचे लेफ्ट- राईट…

गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर पोलीस रस्त्यावर उतरले…. वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळातून पोलीसांचे लेफ्ट- राईट…

पोलीस क्राइम
पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडील सर्व पोलीस ठाण्यांची धडक कारवाई…. पुणे/दि/ प्रतिनिधी/natioanl forumदुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार तिसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत येऊन राडा करतात, वाहनांची जाळपोळ, तोडफोड करतात, चौथ्या पोलीस स्टेशन हद्दीत कोयते, तलवारी हवेत फिरवून मस्तवाल गुन्हेगार पोलीसांना आव्हान देत लुटालूट करतात, पुनः हॉटेल फोडले, पेट्रोलपंप लुटला असे गुन्हे देखील कमी नाहीत, तोच अंमली पदार्थांची विक्री, देशी विदेशी दारूची तस्करी, रोजच्या रोज शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना घडत असल्याने, पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीत कोंम्बिग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग वाढविण्याच्या सुचना दिल्यानंतर, आज संपूर्ण पुणे शहरातील पोलीस अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. मध्यवर्ती पुणे ...
शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, पुणे शहरातील संपूर्ण पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र कोंम्बिग ऑपरेशन सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजुला पोलीस उप आयुक्त संदीपसिंह गिल हे स्वतः रस्त्यावर उतरून, वाहन परवाने तपासणे, दुचाकी वाहनावरील ट्रीपल सिट असणाऱ्यांवर स्वतः कारवाई करीत आहेत, तसेच काही पोलीस स्टेशन हद्दीतील स्लम एरियात जाऊन तेथील मुले व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून व्यसनमुक्ती सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लहान मुलांचा गुन्हेगार कसे वापर करीत आहेत, मुले व्यसन कशी करीत आहेत याबाबत पालकांनी कसे जागृत असले पहिजे याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मात्र भलताच कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्यावाडी येथे पोलीस भागीदारीतील मटका...
पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम… जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती

पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम… जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वाढते शहरीकरण, वाढते नागरीकरण, विस्तारित होत चालेला सोशलमिडीया यामुळे नशाखोरीचे ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखाबंदी केली असली तरीही शासन व पोलीस यांची नजर चुकवून, चोरट्या मार्गाने आजही गुटखा विक्री होत आहे. स्थानिक पोलीस स्टेशनसह इतर गुन्हे शाखांकडून कारवाया सुरू आहेत. त्यातच आता अंमली पदार्थ सेवन करण्याचा नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. अंमली पदार्थ विरोधी विभाग गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कारवाया केल्या तरी सोशल मिडीया आणि ऑनलाईन मार्केटमुळे पोलीसांची नजर चुकवून चोरटी विक्री होत आहे. दंडात्मक कारवाई होत असली तरी सामाजिक जाणिवेतून जनजागृती होणे देखील तितकीच आवश्यकता आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील खडक पोलीस स्टेशन यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेज सह चौका चौकामध्...
पाजा, पाजा… आंबेडकरी बहुजन समाजाला गावठी हातभट्टी पाजा,कष्टकरी, वंचित, पीडित बहुजन समाजाच्या तिसऱ्या पिढीला देखील देशी दारू आणि गावठी हातभट्टीपासून ठार करा, मारा, उध्वस्त करा,

पाजा, पाजा… आंबेडकरी बहुजन समाजाला गावठी हातभट्टी पाजा,कष्टकरी, वंचित, पीडित बहुजन समाजाच्या तिसऱ्या पिढीला देखील देशी दारू आणि गावठी हातभट्टीपासून ठार करा, मारा, उध्वस्त करा,

पोलीस क्राइम
वाडी ते बिबवेवाडी व्हाया 32 परगणा…बेकायदा धंदेवाल्यांना खूप पैसा कमवायचा आहे, पोलिसांना हप्ता घ्यायचाय, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पक्षांचे नेते पुढारी आणि तथाकथित पत्रकारांना ब्लॅकमेलचा धंदा करून खंडणी उकळायची आहे, चौघेही मिळून आंबेडकरी बहुजन समाजाची तिरडी उचलत आहेत नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तातील सामाजिक सुरक्षा गुन्हे विभाग यांनी लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करून सुमारे 8लाख 28 हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन व विमानतळ पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन ही दोन पोलीस स्टेशन नाममात्र आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त...
पुण्यात चोर-दरोडेखोरांनी घातलेल्या दरोड्यातील, सुमारे 5 कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, फिर्यादींना पुनः प्रदान….

पुण्यात चोर-दरोडेखोरांनी घातलेल्या दरोड्यातील, सुमारे 5 कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, फिर्यादींना पुनः प्रदान….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या पाचही परिमंडळातील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असणारे दरोडा, चेन चोरी, घरफोडी, चोरी व इतर गुन्हयातील चोरीस गेलेले सोने / चांदीचे दागिने फिर्यादी यांना पुनः प्रदानाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सुमारे पाच कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक असलेले सोने चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादीस दिले असल्याचे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. पोलीसांना 100 कोटींचा निधी देणार -अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्या प्रकारे करतात. पोलीसांना अद्ययावत शस्त्रे व साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि समाजातील उत्तरदायित्व निधीच्...