पुणे शहराच्या मध्यतर्वी भागातील फरासखाना पोलीस हद्दीत ३ लाखाची घरफोडी, मुद्देमालासहित आरोपी २४ तासात गजाआड
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहराच हार्ट ऑफ सिटी ज्याला म्हटल जात तो मध्यवर्ती भाग फराखाना पोलीस स्टेशनच्या नियंत्रणात आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी ही फरासखाना पोलीसांवर आहे. जे वस्तु पुणे शहरात कुठेही सापडत नाहीत ते पुण्याच्या मध्यवर्ती पेठात अगदी सहज उपलब्ध होते असा नावलौकिक आजही या भागाचा आहे. त्यामुळेच जुन्या काळातील नामचिन भाई आणि डॉनचा देखील याच भागात डेरा आहे. कुठं जरी खुट्ट वाजलं तरी सगळा परिसर ऍलर्ट होतो असंही या भागाच वैशिष्ठ आहे. अशा या वैशिष्ठ्यपूर्ण भागात चोरी तर सोडाच परंतु रस्त्यावर थांबलेल्या हातगाडीवरून एखादी वस्तु लंपास करणे दुरच. पळून पळून कुठे जाईल असंही म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. अगोदरच रस्ते चिंचोळे आहेत. रस्त्यावर धड निट चालता येत नाही, तिथं दुचाकी आणि चारचाकी वाहनांना तर कसरतच करावी लागते. अशा या वैशिष्ठ्यपूर्ण मध्यवर्ती भागात ३ लाखाची घरफोडी झा...