
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील अलीबाबाच्या गुहेतून 40 चोरांना अटक
कुप्रसिद्ध रॉकी व विकी ॲन्थोनी याचे जुगार अड्ड्यावर छापा कारवाई,साडेतील लाखाचा मुद्देमाल जप्तपुणे/दि/नॅशनल फोरम प्रतिनिधी/दोन नंबरचा धंदा करणारा गॅम्बलर पोलीसांना चकवा देण्यासाठी काय काय करू शकतो हे चंदन नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डयावरील कारवाई वरून दिसून आले आहे. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी या अलीबाबाच्या गुहेचा शोध लावला असून त्यातील 40 चोरांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनला हा धंदा माहिती नव्हताच असेही म्हणता येणार नसले तरी, राजेश पुराणिक यांच्यासारख्या मातब्बर पोलीस अधिकाऱ्याने पुण्यातील जुगाऱ्यांना चांगलेच हेरले आहे. त्यामुळेच त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने ही अलीबाबची गुहा शोधण्यात यश आले आहे.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास अवैध मटक्याच्या धंद्याबा...