
पुणे महापालिकेतून चौकशीच्या फाईल्स गहाळ, लोकायुक्तांकडे दाद मागणार?
PMC-Bandhkam
पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या उपनगरातील अनाधिकृत बांधकामे, पार्ट कम्प्लिशन, मान्य बांधकाम आराखड्याव्यतिरिक्त बांधकामे करून भोगवटा प्राप्त करण्याच्या तक्रार अर्जावरील चौकशीची फाईल्स, पुणे महापालिका आयुक्त कार्यालय व बांधकाम विभागातून गहाळ झाले आहेत. याबाबत पुणे महापालिका आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी श्री. दयानंद सोनकांबळे यांनी १० जानेवारी २०१९ रोजी बांधकाम विभागाला पाठविलेल्या पत्रातून दिसून आले आहे.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता श्री. रासकर व श्री. बालवे यांच्याकडील विभागातील अनाधिकृत बांधकामे, पार्ट कम्प्लिशन, मान्य बांधकाम आराखड्याव्यतिरिक्त बांधकामे करून भोगवटा प्राप्त करण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत आहे. या सर्व ...