पुरेसे पाणी द्या, संतप्त महिलांचा पालकमंत्री बापटांच्या घरावर मोर्चा
पुणे/दि/ प्रतिनिधी/
शिवाजीनगर परिसरातील पोलीस वसाहतीत मागील काही दिवसांपासून
एकच तास पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याचे कारण देत पोलीस कुटुंबातील
महिलांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा काढला.
गिरिष
बापट यांनी आंदोलक महिलांशी बोलताना सायंकाळी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे
आंदोलक महिलांनी सांगितले. परंतु बापट यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने महिलांनी
आपल्या लहान मुलांसह रहदारी असलेला फर्ग्युसन रस्ता रोखून धरला. त्यानंतर पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेत आंदोलक महिलांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु
आंदोलक महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत...