पुणे महापालिकेची ११ हजार कोटींची,५ हजार कोर्ट प्रकरणे , विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांच्या उपद्रवी कारभारामुळे न्यायालयात प्रलंबित
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या विधी खात्यामध्ये पुणे महापालिका कोर्ट, शिवाजीनगर कोर्ट, मुंबई हायकोर्ट व सर्वोच्च न्यायालयात सुमारे ५ हजार प्रकरणे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, पुणे महापालिकेला या मिळकतीपोटी अंदाजे सुमारे ११ हजार कोटी रुपयांची प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुणे महापालिकेतील अनेक खात्यांपैकी एक महत्वाचे खाते म्हणून विधी विभागाची गणला होते. याच विधी विभागामध्ये एकुण ५० कर्मचारी कार्यरत असून ३० वकीलांचे पॅनल कार्यरत आहेत. एवढा मोठा ताफा कार्यरत असतांना देखील ११ हजार कोटी रुपयांची प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याने त्याचा थेट परिणाम पुण्याच्या विकास कामांवर होत आहे. त्यामुळे वरील प्रकरणे कोर्टात तातडीने मार्गी लावण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त व मुख्य सभा यांनी लक्ष देण्याची विनंती माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे महा...