Monday, May 6 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्यांना  ७ वा वेतन आयोग लागू

नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्यांना ७ वा वेतन आयोग लागू

शासन यंत्रणा
मुंबई/दि/ राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना १ सप्टेंबर २०१९ पासून ७ वा वेतन आयोग लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील मंजूर व नियमित अधिकारी-कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.        लाभार्थी अधिकारी-कर्मचार्‍यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी पुढील ५ वार्षिक समान हप्त्यात देण्यात येणार आहे.        या निर्णयानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतींना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी स्वतंत्र ठरावाची आवश्यकता असणार नाही. तसेच राज्यातील ३६२ पैकी १४६ नगरपरिषदा व नगरपंचायतींना सध्या देण्यात येणार्‍या सहाय्यक अनुदानातूनच अतिरिक्त...
अन्न भेसळीचे राज्यातून समूळ उच्चाटन करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री

अन्न भेसळीचे राज्यातून समूळ उच्चाटन करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री

शासन यंत्रणा
raval मुंबई/दि/ राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व इतर अन्न पदार्थातील भेसळीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी क्शन मोडवर काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.        अन्न व औषध प्रशासन विभाग हा समाजातील सर्व घटकांना स्पर्श करणारा विभाग आहे. राज्यातील अन्न व औषधाची सुरक्षितता ही जबाबदारी आपल्या विभागावर आहे.        सुरक्षिततेच्या बाबतीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे तितकेच गरजेचे आहे. राज्यातील सर्व अधिकार्‍यांनी विविध विभागाच्या समन्वयाने टाइम बाऊंड पद्धतीने कामाचे नियोजन करून मिथ्याकरण व भेसळीचे उच्चाटन करावे. ते काल झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.         अन्न व औषध प्रशासन विभाग...
खेकड्यानं धरण फोडलं, ही तर बौद्धिक दिवाळखोरी-विजय पांढरे

खेकड्यानं धरण फोडलं, ही तर बौद्धिक दिवाळखोरी-विजय पांढरे

शासन यंत्रणा
tiware dam पुणे/दि/        रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या ‘खेकडा’ वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी जोरदार टीका सुरू झालीय.जलसंधारण विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरेंनी जलसंधारण मंत्र्यांचं ‘खेकडा’ वक्तव्य म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी असल्याचं म्हटलंय.        मोठ्याप्रमाणावर खेकड्यांनी तिवरे धरणं पोखरल्यामुळं ते फुटल्याची प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. त्यावर विजय पांढरेंनी सावंत यांचं ते वक्तव्य अतिशय हास्यास्पद असून याला केवळ बौद्धिक दिवाळखोरीच म्हटलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिलीय.        तिवरे धरणाचा जो बेस आहे तो जवळपास आठशे ते हजार फूट रुंद आहे. खेकडा साधारणतः तीन ते चार फूट पोखरू शकतो आणि त्यामुळे जलसंधारण म...
सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – मंत्री डॉ. संजय कुटे

सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – मंत्री डॉ. संजय कुटे

शासन यंत्रणा
vidhan bhavan mumbai मुंबई/दि/ विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती विमुक्त जाती भटक्या जमाती, इमाव व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज विधानसभा आणि विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिली.        डॉ. कुटे पुढे म्हणाले, ‘बार्टी’ तसेच ‘सारथी’ या दोन्ही संस्थांमार्फत त्या-त्या लक्षित घटकांसाठी अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत आणि त्यामुळे त्या-त्या घटकांच्या युवक युवतींचा विविध माध्यमातून विकास घडविला जात आहे. त्याचप्रकारे, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व...
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय व अतिक्रमण विभाग यांच्या संमनमतातून, मार्केटयार्ड रोडवर अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण धारकांची मुजोरी वाढली.

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय व अतिक्रमण विभाग यांच्या संमनमतातून, मार्केटयार्ड रोडवर अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण धारकांची मुजोरी वाढली.

शासन यंत्रणा
marketyard-illagal अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण विरोधात बांधकाम विभागाचा हातोडा, २४ तास उलटण्याच्या आतच अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत. पुणे/दि/ प्रतिनिधी/      श्रीमंत, धनाढ्यांना पैशाची एवढी मुजोरी चढली आहे की, गरीबांना अधिकाधिक पिळून काढायचे, त्यांच्या धामाच्या- कष्टावर अधिकाधिक आक्रस्ताळेपणा करून स्वतःच्या संपदेमध्ये वाढ करण्याकडे अधिक कल वाढला आहे. पुण्यातील आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठ रोडवर याच धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. धनदांडग्यांचा हा कब्जा बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण विभागाच्या संगनमतातून हा सर्व कारभार सुरू आहे. सध्या बेरोजगारीचा स्फोट होण्याची वेळ आली असतांना, इथली शासन यंत्रणा भांडवलदारांच्या  पायावर लोळण घेत आहे.  बेरोजगारी, उपासमारीने त्रासलेला वंचित, शोषित वर्ग न्यायिक हक्कासाठी बंड करून मुजोरांना चाप लावण्याऐवजी आपआप...
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची शहरात जोरदार कारवाई, मुजोर दुकानदार, व्यापार्‍यांची बेकायदा अतिक्रमणे हटविली.

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची शहरात जोरदार कारवाई, मुजोर दुकानदार, व्यापार्‍यांची बेकायदा अतिक्रमणे हटविली.

शासन यंत्रणा
karwai pmc market yard पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे, शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील दुकानदार व व्यापार्‍यांनी मनमानीपणे दुकानाच्या पुढे पाच/दहा/१५ फुटांचे बेकायदा अतिक्रमण करून, पदपथावरून चालणार्‍यांना नेहमीचा अडथळा ठरत होता. अशा मुजोर दुकानदार व व्यापार्‍यांविरूद्ध पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. पुण्यातील सर्व पेठा तसेच लगतच्या उपरात मोठे दुकानदार व व्यापार्‍यांनी राजकीय आश्रयाचा वापर करून, बेकायदा अतिक्रमणे करणे सातत्याने सुरू ठेवले होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्मिाण होवून, वाहतुक कोंडी सातत्याने होत आहे. यावर पुणे महापालिकेतील अतिक्रमण विभागाने कारवाई सत्र करून, शहरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. पथारी व्यावसायिकांची हातचलाखी - मागील पाच/दहा वर्षांपासून पथारी व्यावसायिकांच्या संदर्...
कृषी खात्याचे मोती, भरत्यात पोतीच्या पोती कृषी संचालक श्री. मोते यांच्या गैरव्यवहाराची व अपसंपदेची चौकशी करून शासन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

कृषी खात्याचे मोती, भरत्यात पोतीच्या पोती कृषी संचालक श्री. मोते यांच्या गैरव्यवहाराची व अपसंपदेची चौकशी करून शासन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

शासन यंत्रणा
विषय प्रवेश -                 राज्यातील पर्जन्यमान हे अनिश्‍चित व खंडीत स्वरूपाचे असल्यामुळे त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होतो. त्यामुळे राज्यातील पाणलोट विकास क्षेत्राच्या कार्यक्रमास अनन्य साधारण महत्व आहे. यामुळेच जिल्हा नियोजन व विकास समिती (जिल्हास्तर) आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व विशेष घटक योजना ( डीपीडीसी, टीएसपी, ओटीएसपी, विघयो) यांच्या उपलब्ध निधीतून मृद व जलसंधारण तसेच कृषी विकासाची कामे करण्यात येतात. तथापी सादर करण्यात आलेले अंदाजपत्रके व उपलब्ध झालेल्या निधीतून कामे करण्याएैवजी त्या निधीचा परस्पर संगनमताने अपहार करण्यात येत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी कृषी आयुक्तालयात चौकशीअभावी प्रलंबित पडलेल्या आहेत. वर्षानुवर्षे निव्वळ चौकशी सुरू आहे, परंतु दोषी अधिकार्‍यांवर ...
राज्यातील १२ हजार कोतवाल दीड महिन्यापासून संपावर, शासनस्तरावर मात्र बेदखल

राज्यातील १२ हजार कोतवाल दीड महिन्यापासून संपावर, शासनस्तरावर मात्र बेदखल

शासन यंत्रणा
Kotwal Samp नांदेड / वृत्तसेवा/  महसूल विभागात गावकामगार म्हणून काम करणारे कोतवाल गेल्या दीड महिन्यापासून संपावर गेले आहेत. मात्र, अद्यापही शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कोतवाल कामगारातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी केली जात आहे.       गाव कामगार म्हणून कोतवालांचा समावेश होतो. रोजगार मिळत नसल्यामुळे कोतवाल म्हणून उच्चशिक्षित तरूण काम करत आहेत. त्यांना मिळणारे मानधन अल्प असून या मानधनातून कुटुंबाचा गाडा कसा हाकावा? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शेतावर तसेच इतर ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना ३०० ते ५०० रुपये मिळते. मात्र, कोतवालांना १६० रूपये रोज मिळतो. या कोतवालांकडून महसूल प्रशासन विविध कामे करून घेत असतात. यामध्ये टपाल वितरण करणे, तलाठी, मंडळ अधिकारी यांना कामात सहकार्य करणे, तहसी...

महाराष्ट्रात ओपन- बॅकवर्ड प्रवर्गातील १० लाख शासकीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित, शासनात ३ लाख रिक्त पदे

शासन यंत्रणा
पुणे महापालिकेतही कालबद्ध पदोन्नतीला खिळ आरक्षण ततवानुसार पदोन्नती नाहीच. अधिकारी - कर्मचारी हवालदिल पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/                 सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांना आरक्षणाच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचे निर्देश सर्वोेेच्च न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली असली, तरी बिहार, केरळ आणि कर्नाटक राज्ये वगळता महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पदोन्नती रखडली आहे. महाराष्ट्रात तर जाणिवपूर्वक आरक्षणाच्या तत्वाची अंमलबजावणी केली जात नाहीये. दरम्यान  राज्यशासनाच्या सेवेतील कर्मचारी आणि पुणे महापालिका, जिल्हा परिषदा यामध्ये देखील  खुल्या प्रवर्गानुसार कालबद्ध पदोन्नती देतांना देखील शैक्षणिक  पात्रता, आणि ए + सीआर ची अट असल्या...

पुणे महापालिकेत ऍन्टी करप्शनची धडक कारवाई बांधकाम विभागातील पर्यवेक्षकाला अटक, सुपर माईंड फरार

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/                 पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विभाग, पथ विभाग, आरोग्य विभाग, डे्रनेज विभाग, पाणी पुरवठा या अव्वल दर्जांच्या खात्यांसह बहुतांश खाती ही भयंकर खादाड खाती असल्याने त्यांची दूरदुरपर्यंत ख्याती आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालयातच खादाडांची भरती असल्याने क्षेत्रिय कार्यालये तर बकासुर झाली आहेत. निव्वळ टेंडर प्रक्रिया पूर्ण करायची आणि प्रत्यक्षात निविदा कामे कागदावरच पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करून, कोट्यवधी रुपयांची बिले उचलण्याचा धडाका सुरू आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयातील विषयपत्रांचा खच पाहिला असता, क्षेत्रिय स्तरावरील निधी नेमका कुठे गायब होतो हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. दरम्यान यातील काही पुणेकर जेंव्हा ऍन्टी करप्शनची मदत घेवून न्यायासाठी झगडतात तें...