प्रस्थापित पक्ष वंचित समूहांना सत्तेत सहभागी करून घेणार नाहीत – आंबेडकर
वंचित घटकांनी सत्तेतील सहभागासाठी संघर्ष उभा केला पाहिजे
आंबेडकर भवन दादर मुंबई येथे झालेल्या बैठकीत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, आजच्या आढावा बैठकीची सुरूवात मी करतोय. राज्यातील निवडणूका संपल्यावनर जे जे लोक मला भेटतात ते मला दोष देतात. आघाडी केली नाही म्हणून संताप व्यक्त करतात. त्यांना राजकारणात आत आणि बाहेर काय सुरू आहे हे कळत नाहीये. आपण वंचितच्या निमित्ताने या दोन निवडणूकीत प्रस्थापितांनी समवून - लपवून ठेवलेला काळा पैसा संपवला आहे. संपवायला भाग पाडलयं. लोकांना पैसे घ्यायची सवय लागलेली होती ती परिस्थिती बदलत आहे. हा एक मोठा बदल आहे. त्याच बरोबर वंचित हा आता एक ब्रँड झाला आहे आपण लक्षात घेतले पाहिजे.
वंचितांचे राजकारण सोपे नाही. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत हा बदल सहजा सहजी स्वीकाला जाणार नाही. यशस्वी होऊ दिला जाणार नाही हे समजुन घ्या. सन १९९५ च्या निवडणूकी नंतर आपले सरकार येईल...