ऑनलाईन लॉटरी-जुगार अड्ड्यावरील कारवाईचा पुराणिक पॅटर्न राजधानी मुंबई पर्यंत पोहोचला
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/मटका, सोरट, ऑनलाईन लॉटरी, रमीचे क्लब हे सर्व जुगार अड्डे असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून सरकारची फसवणूक करणाऱ्या देशविघातक कारवायांचा शोध पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांनी लावला आहे. आता या विरूद्धचा आवाज राजधानी मुंबई पर्यंत पोहोचला असून, सर्वच प्रकारच्या जुगार अड्ड्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांनी या विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून मागील पाच/सहा महिन्यात 32 पोलीस स्टेशन हद्दीत 100 पेक्षा अधिक ठिकाणी बेकायदेशिर कृत्यांना पायबंद घालण्याचे काम केले आहे. यामध्ये बेकायदा व अवैध स्वरूपाचा धंदयामुळे शासनाचे कसे नुकसान होते व या कुप्रवृत्तीविरूद्ध कशी कारवाई करावी याचा...