पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी विशेष मोहीम
पुणे/दि/प्रतिनिधी/
शहरातील
वाहनचालकांकडून करण्यात येणा-या वाहतूक नियमभंगामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असतात.
या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वाहतूक शाखेतर्फे
वेळोवेळी विशेष मोहीम राबवून नियमभंग करणार्या चालकांवर कारवाई करण्यात येत असते.
शहरातील
वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालण्यासाठी वाहतूक शाखा, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन
विभाग, पीएमपीएमएलयांनी एकत्र येत एक मोहीम आखली आहे. या मोहीमअंतर्गत शहरातील गर्दीचे
१०० चौक निश्चित केले असून ते चौक, रस्ते नो व्हायोलेशन झोन म्हणून तयार केले आहेत.
१९ ऑक्टोबरपासून या मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक...