
पुणे महापालिकेपुढे कुणी टाकलाय शेणाचा सडा सरोदे म्हणताय, मग इथच येवून पडा
ma na pa pune
कारण मीच ओढतोय जुन्या पुण्याचा गाडा
बांधकाम कसलं हे तर बादकाम
पुणे/दि/ प्रतिनिधी/
जुन्या डीपीची मुदत २००७ रोजी संपल्यानंतर, पुणे महानगरपालिकेने जुन्या पेठांच्या पुण्याला अस्पृश्यतेची वागणूक दिली. २००७ ते २०१७ पर्यंत एकाही बांधकामाला मंजुरी दयायचीच नाही, अस्सं धोरण ठरवुन, जुनं पुणे शहर ठप्प केलं. परंतु दुसर्या बाजूने पुणे शहराच्या चारही दिशांना उपनगरात दण्णादण बांधकामे होत गेली...उपनगरेच शहरासारखी दिसू लागली. थोडक्यात जिल्हापेक्षा तालुकाच मोठा झाला. पुण्यातील पेठा सोडून बाहेर कुठेही जा... जिकडं तिकडं झगमगाट... पण पुणे शहर म्हणजे जुने वाडे, अरूंद रस्ते, गल्ली आणि बोळा. इथपर्यंतच पुणं शहर सिमित राहिलं आहे. जानेवारी २०१७ रोजी पुणे शहराचं भाग्य उजळलं. नव्या बांधकामांना मंजुरी देण्याचं सुरू झालं. परंतु ज्यांनी नवीन प्रारूप विकास आराखड्याला अधिन राहून बांधकाम...