Wednesday, July 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Author: national forum

जनसुरक्षा कायदयाविरूद्ध पुण्यातील वकीलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध महामोर्चा

जनसुरक्षा कायदयाविरूद्ध पुण्यातील वकीलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध महामोर्चा

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा विधानसभेसह विधानपरिषदेत मंजुर केला असल्याने, त्याविरूद्ध राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढले जात आहेत. जन सुरक्षा कायदयाविरूद्ध पुण्यातील वकील व सामाजिक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. संविधान रक्षक वकील फोरमच्या वतीने बुधवार दि. 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ वकीलांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या होत्या. भारतीय संविधान विरोधी असलेला जनसुरक्षा अधिनियम 2024 रद्द झालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत ज्येष्ठ वकीलांची त्यांची भूमिका मांडली. त्यात अनेक वक्त्यांनी मते व्यक्त केली, त्यात नमूद केले की, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या बे...
डेक्कन जिमखान्या पाठीमागील हॉटेल सुकांता, ऋतुगंधसह डीसीसी इन्फोटेक कडून पार्कींगच्या जागेचा व्यवसायासाठी वापर,

डेक्कन जिमखान्या पाठीमागील हॉटेल सुकांता, ऋतुगंधसह डीसीसी इन्फोटेक कडून पार्कींगच्या जागेचा व्यवसायासाठी वापर,

सामाजिक
हॉटेलमध्ये आलेली सर्व वाहने झेडब्रीजखाली, वाहतुकीची सातत्याने कोंडीनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या डेक्कन जिमखाना अर्थात पुलाची वाडी येथील हॉटेल सुकांता, हॉटेल ऋतुगंध व डीसीसी इन्फोटेक असलेल्या इमारतीमधील पार्कींगच्या जागेवर हॉटेल व इन्फोटेक कंपनीने व्यवसाय थाटला आहे. संपूर्ण पार्कींगचा वापर दुकान व गोडाऊन म्हणून केला जात आहे. तसेच दोन्ही हॉटेल व लॉजिंग मध्ये आलेली वाहने ही झेडब्रीज खाली पार्क केली जात असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतुक पोलीस देखील कारवाई करीत नाहीत. दरम्यान पुणे महापालिकेला दिलेल्या भूंखंडाचा देखील या आस्थापनांकडू वापर केला जात असल्याने स्थानिकांनी याला तीव्र विरोध केला आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम नियमानुसार, खाजगी आस्थापनांमध्ये 1000 स्व्के.फुटाचे हॉटेल किंवा खाजगी आस्थापना असल्यास त्याला किमान 1500 स्व्क...
सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात कंत्राटी कामगारांची मेगा भरती, झाडणकामांसाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर…

सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात कंत्राटी कामगारांची मेगा भरती, झाडणकामांसाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर…

शासन यंत्रणा, सर्व साधारण
सिंहगड कार्यालयात पती-पत्नी, मुलगा, मुलाची पत्नी, मुलगी, मुलीचे पती, मावशी, चुलती, आत्या, सुनेचा भाऊ, मुलाचा मामा, मुलाचा साडू, विहिनबाई, विहीनबाईचा मुलगा, इत्यादी इत्यादी… अख्या कुटूंबासह यादीला नाव पण एकही कामाला नाही… आता बोला… आहे की नाही, ठेकेदार यु.आर.फॅसिलिटीची कमाल… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कंत्राटी कामगारांचा ईपीएफ व ईएसआय भरला जात नाही, किमान वेतनही दिले जात नाही म्हणून 15 क्षेत्रिय कार्यालयातील कंत्राटी कामगारांसह सुरक्षा रक्षकांची ओरड सुरू आहे. दर सहा महिन्यांनी ही नेहमीची ओरड ठरलेली आहेच. ठेकेदार नियम पाळत नाहीत, त्यामुळे कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांचा रोष वाढत आहे. तर पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात नवीन बाब समोर आली आहे. यात आत्ता तर 18 वर्षाखालील मुलांचा वापर झाडणकामांसाठी केला गेला आहे. तसेच आत्ता दर दिवशी कंत्राटी कामगारांची भरती सुरू आहे. न...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस वसाहतीची केली पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस वसाहतीची केली पाहणी

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना भेडसावणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. श्री.पवार यांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, इमारतीची पुनर्बांधणी यासंदर्भातील चर्चेसोबतच सद्यस्थितीत पोलीस वसाहतीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पोलीस वसाहत परिसरासोबतच पोलीस पाल्य वसतीगृहाचीही पाहणी केली. पोलीस वसाहतीचे अत्यंत उत्कृष्ट काम करून राज्यात आदर्श निर्...
ओबीसी स्वतंत्र जनगणनेचा ठराव विधानसभेत मंजूर

ओबीसी स्वतंत्र जनगणनेचा ठराव विधानसभेत मंजूर

शासन यंत्रणा
मुंबई/दि/ शिवसेना व राष्ट्रवादीची भूमिका अमान्य करीत आगामी राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करणारा ठराव विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी मांडला व तो मंजूर करवून घेतला. विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि नियमानुसार हा ठराव सभागृहात मांडण्याचा निर्णय आधी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करावा आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनीही हीच भूमिका मांडली; पण स्वत:हून ठराव मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे असे सांगत नाना पटोले यांनी ठराव मांडला आणि आवाजी मतदानाद्वारे तो एकमताने मंजूर झाल्याचे सांगितले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पटोले यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. या निमित्ताने अध्यक्षांनी सत्ताधारी पक्षाची भूमिका अमान्य के...
भीमा-कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांवर कारवाईचे गृहमंत्र्यांचे संकेत

भीमा-कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांवर कारवाईचे गृहमंत्र्यांचे संकेत

पोलीस क्राइम
मुंबई/दि/ दि. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात घडलेल्या कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणाचा पुणे पोलिसांचा तपास संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद आणि त्यांचे नेते जबाबदार असल्याचा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला होता. मात्र, राजकीय आकसातून पुणे पोलिसांनी कारवाया केल्याचा ठपका पुणे पोलिसांवर ठेवण्यात आल्याने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत आल्याचे सांगण्यात येते. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील कोरेगाव-भीमा येथे दोन गटांत झालेल्या वादानंतर हिंसाचार उफाळला होता. मात्र, या हिंसेला या घटनेच्या आदल्या दिवशी पुण्यातील शनिवारवाड्यावर पार पडलेल्या एल्गार परिषदच कारणीभूत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरूनच पुणे पोलिसांनी फरासखा...
हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा – बाळासाहेब आंबेडकर

हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा – बाळासाहेब आंबेडकर

सर्व साधारण
मुंबई/दि/प्रतिनिधी/ आरएसएस भाजपावाले विरोधकांना ऐनकेनप्रकारे घाबरवतात. देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील तत्कालिन सरकारने आणि केंद्रातील सरकारने मलाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकथित खूनाच्या कटात अडकाविण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यात काहीच त्यांना मिळाले नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवा असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात नागरिकत्व सुधारणा कायदयाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॉंग्रेसवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. भाजपा, आरएसएस देशात अराजकता माजवित आहे. हा कायदा ४० टक्के हिंदूंच्या विरोधात आहे. कूंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने इथल्या भटक्या, आदिवासी, कुणबी तसेच अ...
२५ राज्यांमध्ये गरिबी, उपासमार, असमानता वाढली!

२५ राज्यांमध्ये गरिबी, उपासमार, असमानता वाढली!

सामाजिक
पुणे/दि/ जागतिक बहुआयामी दारिद्रय निर्देशांक (एमपीआय) २०१८ च्या अहवालात भारताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, देशातील २२ ते २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरिबी, उपासमार आणि असमानता मोठया प्रमाणात वाढली आहे. याचप्रमाणे नीती आयोगाच्या २०१९ च्या शाश्वत विकास ध्येय अहवालानुसार, गरिबी, उपासमार आणि आर्थिक असमानता अधिक व्यापक असून यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अर्थसंकल्पाच्या अगोदरच हा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात काय तरतूद केली जाते ते पाहणे महत्त्वाचे असेल. जागतिक बहुआयामी दारिद्रय निर्देशांक यूएनडीपी-ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून जारी करण्यात आला होता. एमपीआयमध्ये सहभागी असलेल्या लोकांना गरिबी, उपासमार यांचे पीडित मानले जाते. एमपीआयमध्ये आरोग्य, शिक्षण, जीवनमान यांसारख्या १० निकषांच्या आधारावर गरिबीचे आकलन केले जाते. २०१५-१६ मध्ये ६४० जिल्ह्यांचे ...
काही लोकांचा मताधिकार काढुन घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय – आंबेडकर

काही लोकांचा मताधिकार काढुन घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय – आंबेडकर

राजकीय
मुंबई/दि/ राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या परस्पर विरोधी विधानांवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागु करणार नाही असं पंतप्रधान जनसभेला संबोधित करतांना म्हणतात, मग त्यांचेच गृहमंत्री लोकसभेत एनसीआर लागु करणार असल्याची घोषणा कशी काय करतात, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. भाजपा आणि संघाचं राजकारण खोटारेडपणावर चालत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) देशावरील संकट असल्याचा आंबेडकर यांनी म्हटल आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एनआरसी वरून खोटं बोलत असल्याचा अरोप त्यांनी केला. एनआसी बद्दल मंत्रिमंडळात,संसदेत कधीच चर्चाही झाली नसल्याचं मोदी भरसभेत सांगतात. मग अमित शहा लोकसभेत एनआरसी लागु क...
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील निविदा कामांतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील निविदा कामांतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील निविदा कामांतील भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून सह महापालिका आयुक्त अर्थात क्षेत्रिय अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत माहिती समजते की, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३६ मधील डॉ. आंबेडकर नगर व प्रेमनगर या मार्केटयार्ड येथील वसाहतींमध्ये वेगवेगळी निविदा कामे काढण्यात आली आहे. यामध्ये सुलभ शौचालय दुरूस्ती, वसाहतीत सिमेंट कॉंक्रीट करणे, डे्रनेज लाईन दुरूस्ती आदी कामांचा समावेश आहे. मार्केटयार्ड आंबेडकरनगर येथे तर अस्तित्वात नसलेल्या शौचालयाची दुरूस्ती केल्याचे दाखविण्यात आले आहे. मार्केटयार्ड आंबेडकरनगर येथे एकुण चार सुलभ शौचालये आहेत. या चारही सुलभ शौचालयांची दुरूस्ती करण्यात आली असल्याचे निविदेतील कागदपत्रे, एमबी व फोटोवरू...