केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले उशिरा शहाणपण
Upendra-Kushwah
पुणे: विकासाच्या अजेंड्यावर सरकार असेल, अशी चर्चा केली गेली. मात्र सरकार आल्यावर विकासाऐवजी भाजपने त्यांचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. त्यांचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. तो आमच्यासाठी नव्हे, तर देशातील लोकांसाठीही योग्य नाही.त्यामुळे सरकारमधून बाहेर पडलो अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले बिहारमधील ’राष्ट्रीय लोक समता पार्टी’चे नेते उपेंद्र कुशवाह यांनी केली.
छगन भुजबळ यांच्यासमवेत कुशवाह यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कुशवाह विरोधकांच्या गोटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत कुशवाह म्हणाले, पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेटलो. भुजबळ गेल्या १२ वर्षांपासून माझे मित्र आहेत. भुजबळ यांच्याशी कौटुंबिक संबंध असून, राजकारणात त्यांचे ...



