
ड्रग्जमुक्त पुण्यासाठी… पुणे शहर पोलीस सरसावले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 ची धडक कारवाई
पुणे/दि/ नॅशनल फोरम/कुठलीही नशा आरोग्यासाठी घातकच असा इशारा देऊनही ती नशा करण्यात सुसंस्कृत पुणे शहरात महाभाग कमी नाहीत. दारू, गांजा, अफू, भांग, ड्रग्जच्या नशेच्या या धुंदीत पुणे शहरासह संपूर्ण देशाला पोखरून टाकले आहे. देशात 10-17 वर्षे वयोगटातील 1.58 कोटी मुले ड्रग्जच्या आहारी गेली असल्याचे समोर आले आहे. तर 16 कोटी लोक दारूचे सेवन करतात. 3 कोटी लोक गांजा व 22.6 दक्षलक्ष लोक अफुचा वापर करतात. तसेच इतर मेफेड्रॉन, चर्रस, कोकेन सारख्यांची तर संख्या कोटीच्या कोटी पुढे गेली असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने देखील कंबर कसली असून, संपूर्ण पुणे शहरात अंमली पदार्थांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. मागील आठवड्यात कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत 2 कोटी 20 लाख रुपयांचा कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आला होता. तर हडपसर येथे 22 कि...